येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत माहिला उमेदवारांची (Assembly Women Candidates) संख्या कमी असल्यांचे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या ६७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार झाल्या आहेत. तर यंदा २०२४ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections Maharashtra) २५० हून अधिक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ४ हजार १३६ उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यापैकी फक्त सहा ते सात टक्के महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Assembly Election 2024)
भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) उपलब्ध आकडेवारीनुसार, सध्याच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण ४ हजार १३६ उमेदवार उभे आहेत. यापैकी जवळपास २५० महिला उमेदवार असून महायुती आणि महाविकास आघाडीने प्रत्येकी ३० महिला उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपाने १८, शिवसेना ०८ आणि राष्ट्रवादीने ०४ महिलांना तिकिटे दिली आहेत. शरदचंद्र पवार गटाच्या ११ महिला उमेदवारांना, तर शिवसेना उबाठा गटाच्या १० आणि काँग्रेसने ९ महिला उमेदवारांना तिकिटे दिली आहेत.
(हेही वाचा – Virar मध्ये भाजप-बविआमध्ये राडा; निवडणूक आयोगाने थांबवली पत्रकार परिषद)
पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार किती?
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात १००० पुरुषांमागे ९२९ महिला मतदार आहेत. तर, २०१९ मध्ये हा रेशो ९२५ पर्यंत घसरला. तसेच, २०२४ मध्ये १००० पुरुष मतदारांमागे ९३६ महिला मतदार आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. तर, ५ कोटी २२ लाख ७३९ पुरुष मतदार (voter) आहेत.
(हेही वाचा – Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा किती पक्ष रिंगणात? )
२०१९ मध्ये काय होती स्थिती?
२०१९ मध्ये भाजपाने १२ महिला उमेदवार उभे केले होते. तर, शिवसेनेने ९, काँग्रेसने १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ९ महिला उमेदवारांना संधी दिली होती. म्हणजेच मुख्य प्रवाहातील पक्षांनी ४५ महिला उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त २४ महिला उमेदवार जिंकल्या. २८८ सदस्यांच्या विधानसभेत फक्त २४ महिला आमदार म्हणजेच फक्त ८ टक्के महिला आमदार होत्या.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community