Delhi : सरकारी बस चालकांचा संप; दिल्लीकरांचे हाल

40
Delhi : सरकारी बस चालकांचा संप; दिल्लीकरांचे हाल
  • प्रतिनिधी 

प्रदुषणामुळे दिल्लीकरांचे जीवन आधीच धोक्यात आले असताना आता सरकारी बस चालकांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांना अतोनात समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्ली (Delhi) सरकार जोपर्यंत स्थायी करणार नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा इशारा बस चालक आणि कंडक्टर यांनी दिला आहे.

दिल्लीतील सव्वा तीन कोटी नागरिकांच्या जीवाचे हाल सुरू आहे. शेजारच्या राज्यांमध्ये पराळी जाळल्यामुळे हवा विषारी झाली आहे. तर दुसरीकडे दिल्ली परिवहनच्या बस चालकांनी संप पुकारला आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक पब्लिक ट्रांसपोर्टचा वापर करतात. यासर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

(हेही वाचा – ठाकरेंचे मदतीचे आवाहन; Jayant Patil काय करणार ?)

२८ हजार कंत्राटी कामगार

दिल्ली (Delhi) परिवहनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. सध्या डीटीसीमध्ये सुमारे २८ हजार कंत्राटी कामगार आहेत. यामध्ये ड्रायव्हर, कंडक्टर आणि सफाई कामगारांचा समावेश आहे. विभागात २० वर्षांपूर्वी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्यात आली होती. आपल्याला स्थायी नोकरी द्यावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. आम्ही जवळपास पूर्ण आयुष्य डीटीसीला दिली आहेत. अशा परिस्थितीत कायमस्वरूपी नोकरी द्यावी आणि समान वेतन प्रणाली लागू करावी, अशी मागणी केली आहे.

डीटीसीचे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. शनिवारी सरोजिनी नगर बस डेपोमध्ये महिला बस डेपो म्हणून सुरू करण्यात आली. तत्कालीन परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी त्याचे उद्घाटन केले. यादरम्यान डझनभर महिला बसचालकांनी कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. अनेक कंत्राटी कामगारांच्या संघटनांनीही याला पाठिंबा दिला. सोमवारी राजधानीतील अनेक बस डेपोतील कर्मचारी संपावर गेले. त्यामुळे केवळ ५० टक्क्यांहून कमी बसेस रस्त्यावर येऊ शकल्या.

(हेही वाचा – Virar मध्ये भाजप-बविआमध्ये राडा; निवडणूक आयोगाने थांबवली पत्रकार परिषद)

डीटीसीने समिती स्थापन केली

दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या आंदोलनाबाबत तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी डीटीसीला कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी समिती स्थापन करण्यास सांगितले होते. यासंदर्भात सोमवारी डीटीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी समिती स्थापन केली आहे. ही समिती कंत्राटी कामगारांच्या मागण्यांचा विचार करून अहवाल तयार करणार आहे.

दिल्ली मेट्रोला फायदा

बस चालकांच्या संपाचा फायदा दिल्ली (Delhi)  मेट्रोला झाला आहे. सोमवार १८ नोव्हेंबर रोजी ७८ लाख ६७ हजार १७ दिल्लीकरांनी मेट्रोने प्रवास केला. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या होय. दिल्ली मेट्रोची विश्वासार्हता, वक्तशीरपणा आणि अखंड प्रवासावर प्रवाशांनी दाखवलेला वाढता आत्मविश्वास या आकडेवारीवरून दिसून येतो, असे डीएमआरसीने म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, हवेतील प्रदुषणात दिल्लीकरांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी दिल्ली (Delhi) मेट्रोकडून दिवसात ६० अतिरिक्त ट्रिप चालवत आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा किती पक्ष रिंगणात? )

मेट्रो लाईन प्रवाशांची संख्या

रेड लाइन : 8,56,692
येलो लाइन : 20,99,097
ब्लू लाइन : 20,80,221
ग्रीन लाइन : 4,12,935
वायलेट लाइन : 7,93,324
पिंक लाइन : 8,15,223
मैजेंटा लाइन : 6,19,711
ग्रे लाइन : 50,128
रैपिड मेट्रो : 57,701
एयरपोर्ट लाइन : 81,985

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.