गरोदरपणाच्या पहिल्या टप्प्यातील लक्षणे बहुतेक महिलांमध्ये गर्भधारणेनंतर 1 ते 2 आठवड्यांनंतर दिसू लागतात. या लक्षणांमध्ये थकवा, मळमळ (विशेषतः सकाळी), स्तनांमध्ये संवेदनशीलता आणि चवीतील बदल यांचा समावेश होतो. काही महिलांना (Women) गर्भधारणेच्या 6-7 व्या दिवशी हलका रक्तस्राव किंवा डाग दिसतो, ज्याला इम्प्लांटेशन ब्लीडिंग असे म्हणतात. हे एक सामान्य लक्षण असून गर्भाशयात भ्रूणाच्या स्थिरतेसाठी होणाऱ्या प्रक्रियेमुळे घडते.