Assembly Election 2024: मतदानाच्या जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची रॅली

55
पुण्यातील कोथरूड (Kothrud) येथील यशवंतराव नाट्यगृहाच्या (Yashwantrao Theater) परिसरात मंगळवार, 19 नोव्हेंबर रोजी पुणे महानगर पालिकेच्या शालेय लहान विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवत समाजाला लोकशाही प्रक्रियेचं महत्त्व पटवून दिलं. (Assembly Election 2024)

मतदानाच्या जनजागृतीसाठी (Voting awareness) काढलेल्या या रॅलीत लहान मुलांनी आपल्या निरागसतेतून प्रौढ मतदारांना एक महत्त्वाचा संदेश दिला – “आमचं भविष्य सुरक्षित ठेवा! तुमचं एक मत आमचं आयुष्य घडवू शकतं.” या चिमुकल्यांनी हातात विविध संदेश लिहिलेले फलक घेऊन रस्त्यावरून जनतेपर्यंत पोहोचत, आपल्या हक्काचं मतदान करण्याचं भावनिक आवाहन केलं. “चांगल्या लोकांच्या हाती देश द्या” आणि “मतदान करा, देश वाचवा” अशा घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला. त्यांच्या निरागस चेहऱ्यावरून झळकणाऱ्या आशावादाने उपस्थित मतदारामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण केला.

(हेही वाचा – भाजपा नेते Vinod Tawde यांनी फेटाळले पैसे वाटल्याचे आरोप; म्हणाले, ४० वर्ष राजकारणात पण…)

पथनाट्याच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना मतदानाची प्रक्रिया फक्त एक हक्क नसून एक महत्त्वाची जबाबदारी असल्याचं प्रभावीपणे समजावून सांगितलं. या लहानग्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने उपस्थित प्रेक्षकांना विचार करायला लावलं. त्यांच्या सादरीकरणातून त्यांनी सांगितलं की, “मतदान ही देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. योग्य उमेदवार निवडून दिल्यासच देशाचा विकास शक्य होईल आणि आमचं भविष्य सुरक्षित राहील.” त्यांच्या या प्रामाणिक आणि उत्साही प्रयत्नांमुळे प्रेक्षकांच्या मनाला हात घातला आणि अनेकजणांना मतदानाची कर्तव्य भावना पटली. हा उपक्रम पुणे महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त माननीय अशा राऊत यांच्या प्रयत्नांमुळे या रॅलीला भव्य स्वरूप मिळालं. रॅलीमध्ये पालक, शिक्षक, आणि स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मुलांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पालकांनी त्यांना मार्गदर्शन केलं, तर शिक्षकांनी त्यांच्या सादरीकरणासाठी मेहनत घेतली. या लहान मुलांनी आपल्या कृतीतून मतदान जनजागृतीसाठी एक नवा आदर्श निर्माण केला.

(हेही वाचा – Delhi : सरकारी बस चालकांचा संप; दिल्लीकरांचे हाल)

देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणं किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी प्रभावीपणे मांडलं. “आम्हाला शिक्षण, आरोग्य, आणि स्वच्छता यासारख्या सुविधा हव्याच आहेत. हे सर्व शक्य होण्यासाठी चांगल्या नेतृत्वाची निवड गरजेची आहे,” असा विचार त्यांनी समाजासमोर मांडला. लहान मुलांच्या या छोट्याशा पण प्रभावी उपक्रमामुळे प्रौढ मतदारांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. “मतदान करा, देश घडवा,” असा संदेश देत या लहानग्यांनी पुण्यात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं. तसेच या कार्यक्रमात भारतीय युवक कल्याण व व्यायाम केंद्र, आम्ही पुणेकर, स्थानिक स्वराज्य, श्रमिक फाउंडेशन इत्यादी संस्था उपस्थित होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.