Mahim Assembly Fight : शेलारांच्या भूमिकेशी स्थानिक भाजपा नेते सहमत

27
Mahim Assembly Fight : शेलारांच्या भूमिकेशी स्थानिक भाजपा नेते सहमत
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

माहीम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील लढतीबाबत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडलेल्या मताबाबत स्थानिक नेते आणि पदाधिकारी हे सहमत असून शेलारांच्या भूमिकेनुसारच विभागात काम केले जात आहे. भाजपाकडून युती-धर्म पाळलाच जाणार आहे, परंतु माहीममध्ये मात्र भाजपा मनसेच्या बाजूने पूर्ण ताकदीनिशी उभी राहील असे भाजपाच्या माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी स्पष्ट केले. (Mahim Assembly Fight)

माहीम विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदा सरवणकर, शिवसेना उबाठाचे महेश सावंत आणि मनसेचे अमित राज ठाकरे हे उमेदवार असून या लढतीमध्ये महायुतीचे उमेदवार असलेल्या सदा सरवणकर यांच्या पाठिशी भाजपा पूर्ण ताकदीनिशी उभी नसून भाजपाचे समर्थन मनसेच्या उमेदवाराला असेल असे बोलले जात होते. त्यातच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपण तन मन धन लावून युती-धर्म पाळू, पण मला खरा आनंद तेव्हाच होईल जेव्हा मनसेचे अमित राज ठाकरे हे निवडून येतील, असे विधान केले. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. (Mahim Assembly Fight)

(हेही वाचा – माझ्यासारख्याचे असणेच पुरेसे, आम्हाला रोज सकाळी दिसावं लागत नाही; Madhav Bhandari यांचा उद्धव ठाकरेंना टोला)

ही संभ्रमाची स्थिती असतानाच भाजपाच्या माहीम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी, आपल्या समाजमाध्यमावरील फेसबूकवर ज्या पोस्ट केल्या आहेत, त्याही युतीच्या उमेदवाराच्या विरोधात आहेत. अक्षता तेंडुलकर यांनी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा व्हिडीओ व्हायरल केला आहे, तसेच २०२२ मध्ये स्थानिक आमदार आणि महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनी मैदानात केलेल्या बांधकामाचा आणि त्यावर आक्षेप घेतल्यानंतर शिवसेना शाखाप्रमुख अजय कुसुम यांनी केलेली अरेरावी भाषा याबाबतचा जुना व्हिडीओ व्हायरल करत आम्हीच युती-धर्म पाळायचा का असा सवाल केला आहे. (Mahim Assembly Fight)

याबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’ने भाजपाच्या माहीम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जी भूमिका घेतली आहे, त्याच भूमिकेचे पालन आम्ही पदाधिकारी, कार्यकर्ते करून तोच संदेश मतदारांपर्यंत पोहोचवत आहे. आमचा पूर्ण पाठिंबा मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांना असल्याचे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले. प्रत्येक वेळी आम्हीच युती-धर्म का पाळायचा असा सवाल करत आमचा पाठिंबा मनसेलाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. माहीममध्ये मनसेच्या इंजिनमध्ये भाजपाकडून इंधन भरण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जात असून युतीधर्म पाळतानाच मनसेच्या उमेदवाराला मदत करण्याची तारेवरील कसरत भाजपाकडून केली जात असल्याची माहिती मिळत आहे. (Mahim Assembly Fight)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.