Assembly Election 2024 : आचारसंहिता कालावधीत ५३२ एफआयआर; सिंधुदुर्गात मात्र एकही गुन्हा नाही

225
Assembly Election 2024 : आचारसंहिता कालावधीत ५३२ एफआयआर; सिंधुदुर्गात मात्र एकही गुन्हा नाही
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४’ अंतर्गत बुधवारी २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहिता कालावधी दरम्यान आचारसंहिता व निवडणूक विषयक विविध तक्रारींच्या अनुषंगाने ५३२ एफआयआर दाखल झाले आहेत. यापैकी २१० प्रकरणे ही आदर्श आचारसंहितेच्या भंगाशी संबंधित असून ६३ प्रकरणे ही समाज माध्यमांशी संबंधित आहेत. तर उर्वरित २५९ प्रकरणे ही इतर बाबींशी संबंधित आहेत. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही एफआयआर दाखल दाखल करण्यात आलेला नाही तर सर्वांधित एफआयआर नाशिक जिल्ह्यात आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वांधिक ४९ एफआयआर दाखल झालेले आहेत. (Assembly Election 2024)

विधानसभा निवडणुकीसंदर्भातील सर्व प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात संपन्न व्हावी, यासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल यांच्या मनुष्यबळाचा समावेश आहे. या सर्व यंत्रणेला सतर्क आणि सजग राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Assembly Election : मतदारांना लुटणार्‍या ‘खाजगी ट्रॅव्हल्स’वर कठोर कारवाई करावी; सुराज्य अभियानची मागणी)

‘एफआयआर’ बद्दलची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :

१) मुंबई शहर व मुंबई उपनगर : ३६

२) ठाणे : ३८

३) पालघर : ०५

४) नाशिक : ४९

५) धुळे : ०१

६) बीड : १८

७) अहिल्यानगर : ३२

८) पुणे : ४८

९) छत्रपती संभाजीनगर : २५

१०) जालना : १०

११) जळगाव : १०

१२) नंदुरबार : ०३

१३) कोल्हापूर : २६

१४) रत्नागिरी : १०

१५) सिंधुदुर्ग : ००

१६) सातारा : १५

१७) सांगली : ०८

१८) सोलापूर : २८

१९) लातूर : १२

२०) धाराशिव : ०६

२१) रायगड : १९

२२) परभणी : ०७

२३) नांदेड : १५

२४) हिंगोली : १२

२५) यवतमाळ : ०७

२६) वाशिम: ०३

२७) वर्धा : ०६

२८) अमरावती : १७

२९) अकोला : ०२

३०) बुलढाणा : ०८

३१) चंद्रपूर : ०३

३२) गडचिरोली : ०६

३३) भंडारा : १५

३४) गोंदिया : ०३

३५) नागपूर : २९

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.