Election 2024 : निवडणुकीत जप्त केलेल्या पैशांचे पुढे काय होते?

72
Election 2024 : निवडणुकीत जप्त केलेल्या पैशांचे पुढे काय होते?
Election 2024 : निवडणुकीत जप्त केलेल्या पैशांचे पुढे काय होते?

विधानसभा निवडणुकीसाठी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र निवडणुक काळात बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली जाते. प्रत्येकवेळी जप्त केलेली निवडणुक रक्कम निवडणुकीशी संबंधित असेलच असं नाही. त्यामुळे निवडणुक आयोगाकडून निवडणुक कालावाधीत जप्त केली जाणारी रक्कम, दारु, अमली पदार्थ आणि मौल्यवान धातू यांचे पुढे काय केले जाते असा प्रश्न उपस्थित होतो. (Election 2024)

( हेही वाचा : Konkan Railway : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी!  रेल्वेब्लॉकमुळे ‘या’ गाड्या रखडणार

निवडणुकी दरम्यान मतदारांना पैशाच आमिष दाखवणं, भेटवस्तू, दारु, मोफत जेवण किंवा मतदारांना धमकावण्यासाठी पैसा-बळाचा वापर हे IPC च्या कलम १७१ ख E आणि १७२ ग अंतर्गत गुन्हा आहे. त्याशिवाय लोक प्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२३ अंतर्गत सुद्धा हे भ्रष्ट आचरण मानलं जातं. (Election 2024)

जप्त केलेल्या पैशांचे काय केले जाते?

कोणत्याही गाडीमध्ये १० लाख रुपयापेक्षा अधिक रोख रक्कम सापडली, कुठल्या गुन्ह्याशी, कुठल्या उमेदवारांशी, पक्ष पदाधिकाऱ्यांशी संबंध नसल्यास स्टॅटिक मॉनिटरिंग टीम ही रक्कम जप्त करणार नाही. स्टॅटिक मॉनिटरिंग टीम आयकर कायद्यातंर्गत कारवाईसाठी आयकर विभागाला (Income Tax Department) माहिती देते. चौकशी दरम्यान गुन्ह्याचा संशय आल्यास कार्यकारी मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत सीआरपीसी तरतुदीनुसार स्टॅटिक मॉनिटरिंग (Static monitoring) टीम रोख रक्कम आणि अन्य वस्तु जप्त करते. त्यानंतर SST चे प्रभारी पोलीस अधिकारी न्यायालयात २४ तासांच्या आत FIR नोंदवतात. जर जप्त केलेली रक्कम राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याशी संबंधित नसेल तर रक्कम रिलीज करण्यासाठी स्पीकिंग आदेश जारी केला जातो. समिती संपूर्ण विषायाचा आढावा घेऊन आदेश देते. तर काही प्रकरणात निवडणुकीसाठी पैशांचा वापर होणार हे कोर्टात सिद्ध झाल्यास तो पैसा जिल्हा कोषागरता जमा केला जातो. (Election 2024)

जप्त केलेल्या मद्याचं काय करतात?

निवडणुकीच्या काळात रोख रकमेखेरीज मोठ्या प्रमाणावर मद्यसुद्धा जप्त केलं जातं. निवडणूक काळात मिळालेलं सगळं मद्य एका ठिकाणी गोळा केलं जातं आणि नंतर ते एकत्रितपणे नष्ट केलं जातं. (Election 2024)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.