रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास करण्यासाठी आता एक आंनदवार्ता समोर आली आहे. जनरलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी रेल्वेने विशेष तयारीची सुरुवात केली आहे. जनरल डब्यांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे रेल्वे मंत्रालयाने जनरल बोगींची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Railway)
( हेही वाचा : पराभव दिसू लागल्याने Vinod Tawde यांच्यावर आरोप; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला)
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात सुमारे ३७० नियमित गाड्यांमध्ये एक हजारातून अधिक जनरल डबे जोडले जाणार आहेत. यामुळे दररोज जनरल डब्यात प्रवास करणाऱ्या एक लाख प्रवाशांना फायदा होईल. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन वर्षात १० हजार जनरल डब्बे बनविण्याची योजना असून दररोज आठ लाख अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकतील. (Railway)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community