महाराष्ट्र (Maharashtra Assembly) आणि झारखंड (Jharkhand assembly) विधानसभा निवडणुकासाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान होणार आहे. मतदानासाठी पोलिंग पार्टी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व २८८ आणि झारखंडच्या ३८ जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे.
यापूर्वी १३ नोव्हेंबर रोजी झारखंडमधील ४३ जागांसाठी मतदान झाले होते. तर उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही बुधवारी मतदान होणार आहे. बुधवारी यूपीमध्ये ९ जागांसाठी मतदान होणार आहे. तर सर्व राज्यांमध्ये २३ नोव्हेंबर (शनिवार) रोजी मतमोजणी होणार आहे.
(हेही वाचा – Aditya Thackeray यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन; भाजपाकडून आयोगाकडे तक्रार)
यावेळी निवडणूक आयोगाने (Election Commission) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची घोषणा केली होती, तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान घेण्याची घोषणा केली होती, पहिल्या टप्प्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. त्याच दिवशी ११ राज्यांतील पोटनिवडणुकांसाठीही मतदान झाले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community