Maharashtra Assembly Election 2024: मतदानाला सुरूवात; PM Modi यांचे मतदारांना लोकशाहीचा उत्सव वाढवण्याचे आवाहन

35
Maharashtra Assembly Election 2024: मतदानाला सुरूवात; PM Modi यांचे मतदारांना लोकशाहीचा उत्सव वाढवण्याचे आवाहन
Maharashtra Assembly Election 2024: मतदानाला सुरूवात; PM Modi यांचे मतदारांना लोकशाहीचा उत्सव वाढवण्याचे आवाहन

राज्यातील 288 विधानसभा (Maharashtra VidhanSabha Election 2024) मतदारसंघासाठी आज (बुधवार 20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग (Election Commission) आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Maharashtra VidhanSabha Election 2024) या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमधील मतदारांना लोकशाहीचा उत्सव वाढवण्याचे आवाहन केले आहे. आज दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुका आहेत.

(हेही वाचा-Maharashtra VidhanSabha Election 2024: विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदानाला सुरूवात)

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या X हँडलवर लिहिले, “आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra VidhanSabha Election 2024) सर्व जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील सर्व मतदारांना माझे आग्रहाचे आवाहन आहे की, त्यांनी उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी. यावेळी सर्व तरुण आणि महिला मतदारांना आवाहन करतो की, त्यांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन मतदान करावे.”

त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले, “झारखंडमधील (Jharkhand) लोकशाहीच्या महान उत्सवाचा आज दुसरा आणि शेवटचा टप्पा आहे. मी सर्व मतदारांना यात उत्साहाने सहभागी होऊन मतदानाचा नवा विक्रम निर्माण करण्याचे आवाहन करतो. या निमित्ताने मी विशेषतः माझ्या सर्व तरुण मित्रांचे अभिनंदन करतो जे पहिल्यांदाच मतदान करत आहेत. तुमचे प्रत्येक मत ही राज्याची शक्ती आहे.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (Maharashtra VidhanSabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.