राज्यातील 288 विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) मतदारसंघासाठी आज (बुधवार 20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग (Election Commission) आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Maharashtra Assembly Election 2024) मात्र त्यातच आता काही ठिकाणी मतदारसंघात मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी ईव्हीएम मशीन (EVM Machine) बंद असल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
जळगावात ईव्हीएम मशीन बंद
जळगावच्या (Jalgaon) जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन (EVM Machine) सुरु होत नसल्याने अनेकांचा गोंधळ झाला. ईव्हीएम मशीन सुरू होत नसल्यामुळे मतदानाला 15 ते 20 मिनिटे विलंब झाला. हे ईव्हीएम मशीन सुरु व्हावे यासाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांची मदत घेतली. यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी मशीन सुरु झाल्यावर त्याला सील करण्यात आले. यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. हे ईव्हीएम मशीन सुरू होईपर्यंत मतदानासाठी आलेले नागरिक आणि महिला बाहेर थांबून होते. (Maharashtra Assembly Election 2024)
मालेगाव बाह्यमध्ये ईव्हीएम मशीन बंद
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात (Malegaon Assembly Constituency) बूथ क्रमांक 292 या ठिकाणी असलेले ईव्हीएम मशीन (EVM Machine) बंद पडले आहे. या बूथवर असलेले ईव्हीएम मशीन हे इनव्हॅलिड दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मालेगावातील अनेक मतदार हे ताटकळत असल्याचे दिसत आहेत. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अनेक नागरिक हे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांचा खोळंबा होत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
नाशिकमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड
नाशिकमधील (Nashik) पंचवटी परिसरातील सोनुबाई केला मतदान केंद्रावरील 189 बूथवर तांत्रिक बिघाड झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे नाशिकमधील मतदान हे 20 मिनिटे उशीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मतदानासाठी गेलेल्यांचा खोळंबा झाला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community