Bitcoin Scams : नाना पटोले आणि सुप्रिया सुळेंनी निवडणुकीत वापरले परकीय चलन; भाजपाने थेट पुरावेच दिले

70
Bitcoin Scams : नाना पटोले आणि सुप्रिया सुळेंनी निवडणुकीत परकीय चलन वापरले; भाजपने थेट पुरावेच दिले
Bitcoin Scams : नाना पटोले आणि सुप्रिया सुळेंनी निवडणुकीत परकीय चलन वापरले; भाजपने थेट पुरावेच दिले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन व अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केला आहे, असे आरोप पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी केले आहे. भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवार, १९ नोव्हेंबरच्या रात्री पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आणि यासंबंधीचे कथित पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट सादर केले आहेत. (Bitcoin Scams)

(हेही वाचा – Maharashtra Exit Poll: महाराष्ट्र विधानसभेचे एक्झिट पोल कधी येणार ? वाचा सविस्तर…)

 

भाजपाने विचारले प्रश्न

परदेशी चलनाचा वापर करून सुळे व पटोले यांनी निवडणुकीवर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024), मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी देखील सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेतून सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी सुप्रिया सुळे, नाना पटोलेंसह मविआला काही प्रश्न विचारले आहेत.

  • तुम्ही बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का ?
  • डीलर गौरव मेहता व अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधला आहे का?
  • हे व्हॉट्सअ‍ॅप चॅट तुमचं आहे का?
  • हे चॅट तुमचं असेल तर यामध्ये तुम्ही कोणाबद्दल बोलताय?
  • या कॉल रेकॉर्डिंग्समधील आवाज तुमचाच आहे का?

या प्रश्नांची उत्तरे भाजपाने सुप्रिया सुळे यांच्याकडे मागितली आहेत. भाजपाच्या (BJP) या आरोपांनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्रिवेदी यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं खासदार सुळे यांनी म्हटले आहे.

काय म्हणतात सुप्रिया सुळे ?

एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भाजपाच्या सुधांशू त्रिवेदी यांनी केलेले आरोप निराधार आहेत. मात्र मला त्याचं आश्चर्य वाटत नाही कारण मतदानाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचे आरोप नेहमीच केले जातात. त्यांच्याकडून (भाजपा) अशा प्रकारे खोटी माहिती पसरवण्याचे प्रयत्न नेहमीच होतात. त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष न करता मी त्यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे. माझे वकील त्यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी व दिवाणी खटला भरतील. आम्ही त्यांना तशी नोटीस बजावणार आहोत. (Bitcoin Scams)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.