राज्यातील 288 विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) मतदारसंघासाठी आज (बुधवार 20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग (Election Commission) आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे (Amit Thackeray)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“पहिल्यांदा तुमचा मुलगा निवडणुकीला उभा”
अमित ठाकरे (Amit Thackeray)म्हणाले की, “अनेक लोक मला भेटत आहेत. शुभेच्छा देत आहेत. वारं बदलतंय. पहिल्यांदाच निवडणुकीला उभा आहे. त्याच्यामुळे जो प्रतिसाद मिळतोय अतिशय उत्तम आहे. जे मी 100 टक्के देऊ शकतोय ते मी देतो. जनतेला आवाहन करेन, पहिल्यांदा तुमचा मुलगा निवडणुकीला उभा आहे. एक माहिम दादरकर उभा आहे. त्यामुळे तुमचं मत वाया जाऊ देणार नाही. एवढी मी तुम्हाला नक्की खात्री देतो.” (Maharashtra Assembly Election 2024)
“मनसेचं इंजिन नक्कीच जोरदार धावेल”
“राज साहेबांना तुमचा पाठिंबा असुद्या. मनसेचं इंजिन नक्कीच जोरदार धावेल. जो निकाल तुम्हाला दिसेल तो पक्षाच्या बाजूने, राज ठाकरेंच्या बाजूने सकारात्मक दिसेल.” असंही अमित ठाकरे म्हणाले आहेत. याचदरम्यान अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची भेट झाली. सदा सरवणकर मतदान करण्याच्या आधी सिद्धिविनायक मंदीराच्या दर्शनसाठी गेले होते. यादरम्यान अमित ठाकरे (Amit Thackeray)देखील यावेळी सिद्धिविनायक मंदीराच्या दर्शनसाठी दाखल झाले होते. (Maharashtra Assembly Election 2024)
पहिल्यांदा अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांची भेट
यावेळी सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंची भेट झाली. यादरम्यान दोघांनीही हात मिळवत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर अमित ठाकरे म्हणाले की पहिल्यांदा सदा सरवणकरांची भेट झाली. यावेळी मी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनीदेखील मला शुभेच्छा दिल्या. 23 नोव्हेंबरला कोणाचा विजय होणार, हे समोर येईल, असं अमित ठाकरेंनी सांगितले. (Maharashtra Assembly Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community