राज्यातील 288 विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मतदारसंघासाठी आज (बुधवार 20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग (Election Commission) आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
(हेही वाचा-Maharashtra VidhanSabha Election 2024: विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ६.६१ टक्के मतदान)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केलं. वरळी विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंच्या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिवसेना (शिंदे) गटाला मनसेचा पाठिंबा असल्याचे बोललं जात आहे. त्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
व्हायरल पत्रावर बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray ) म्हणाले, “वरळी विधानसभेत व्हायरल झालेलं पत्र खोटं आहे, आम्ही कोणत्याही गटाला पाठिंबा दिलेला नाही. आम्ही आमच्यासाठी निवडणूक लढवत आहोत. वरळीकर मतदार सूज्ञ आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील. मतदान जितकं कमी होईल, तितकं त्यांच्या (मतदारांच्या) पदरी काय पडेल, हे मागच्या पाच वर्षांत आपण पाहिलं. लोकांनी अधिकाधिक मतदान करावं. आपलं मत व्यक्त करण्यापासून मागे हटायला नको.” असं राज ठाकरे म्हणाले. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
अनिल देशमुख यांच्यावर हल्ला, अनेक ठिकाणी पैसे वाटप करताना काही जणांना रंगे हात पकडण्यात आले या प्रकरणावर राज ठाकरे यांना विचारण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “मी मागेच मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सांगितले होते. आजपर्यंत निवडणुकांमध्ये जे पाहायला मिळाले नाही, ते या निवडणुकीत पाहायला मिळेल. आता राज्यात तसेच होताना दिसत आहे.” (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
(हेही वाचा-Maharashtra VidhanSabha Election 2024: विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदानाला सुरूवात)
अमित ठाकरेंना (Amit Thackeray) मतदान करून कसं वाटलं? या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी आजवर अनेकवेळा मतदान केले आहे. आजही मतदान केलं. मतदान करून नेहमीच चांगलं वाटतं.” असं राज ठाकरे (Raj Thackeray ) म्हणाले. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community