Bitcoin Scam प्रकरणी सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या…

86
Bitcoin Scam प्रकरणी सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या...
Bitcoin Scam प्रकरणी सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन व अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा (Bitcoin Scam) वापर केला आहे, असे आरोप पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांनी केले आहे. भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवार, १९ नोव्हेंबरच्या रात्री पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आणि यासंबंधीचे कथित पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट सादर केले आहेत.

(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित ठाकरेंना मतदान करून कसं वाटलं? Raj Thackeray म्हणाले…)

सुप्रिया सुळे आणि गौरव मेहता यांच्यात काय झाली चर्चा ?

रवींद्र पाटील यांनी ऐकवलेल्या क्लिपमध्ये सुप्रिया सुळे आणि गौरव मेहता (Gaurav Mehta) यांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू येत आहे. त्रिवेदी यांनी ऐकवलेल्या ऑडिओमध्ये केवळ सुप्रिया सुळे यांचा आवाज ऐकू येत आहे.

‘तुम्ही सर्व बिटकॉईन काढून कॅश का घेत नाही? सध्याच्या किंमती अनुकूल आहेत. निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे आम्हाला मोठा निधी लागणार आहे. चौकशीबद्दल घाबरू नका, आमचं सरकार आल्यानंतर ते हाताळू. फक्त ते पूर्ण करा.’

‘गौरव काय चाललं आहे? तुम्ही कुणीही प्रतिक्रिया देत नाही. माझ्यासोबत खेळ खेळू नका. गुप्ता गायब आहे, मग पैशांचं काय झालं? तो म्हणाला सगळे बिटकॉईन आणि कॅश तुमच्याकडे आहे. मला लगेच फोन कर, आम्हाला पैशांची गरज आहे. निवडणुका सुरू आहेत’

रेकॉर्डिंग्ज आणि मेसेजेस खोटे – सुप्रिया सुळे

‘गौरव तू आम्हाला उत्तर का देत नाहीयेस? आम्हाला पहिले पैसे हवे आहेत’, असे सुप्रिया सुळे बोलत आहेत, असे ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. या प्रकरणी सुप्रिया सुळेंनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना या आरोपांवर उत्तर दिलं आहे. “एकतर काल संध्याकाळी मला माध्यमांमधून कळलं की, असे आरोप झाले आहेत. माझ्या हातात ते व्हॉइस रेकॉर्डिंग आल्यानंतर मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अर्थात अमितेश कुमार यांना फोन केला. मी त्यांना सांगितलं की, काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहेत आणि मला सायबर क्राईमकडे तक्रार करायची आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही तक्रार करा. मी काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे की, या सगळ्या रेकॉर्डिंग्ज आणि मेसेजेस खोटे आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.