Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मतदान सुरु झाले, तरी महाविकास आघाडीचे एकमत नाही; सोलापूरमध्ये काँग्रेसचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर

48
मतदान सुरु झाले, तरी महाविकास आघाडीचे एकमत नाही; सोलापूरमध्ये काँग्रेसचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर
मतदान सुरु झाले, तरी महाविकास आघाडीचे एकमत नाही; सोलापूरमध्ये काँग्रेसचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर

सोलापूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या मतदारसंघात इच्छुक काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला. विशेष म्हणजे मुळक यांच्या प्रचारासाठी स्थानिक काँग्रेस खासदार, नेत्यांपासून सगळेच प्रचारात दिसून आले. मतदानाच्या आदल्या दिवशी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी मतदारांना अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांना मत देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातही काँग्रेस आणि उबाठा गटाचे बिनसलेले दिसत आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा – महाराष्ट्रातील जनता विकासाला भरभरुन मतदान करेल: CM Eknath Shinde)

गेल्या महिनाभरापासून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहत होते. यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे. असे असले, तरी महाविकास आघाडीतील नेते अजूनही एकमेकांवर आघात करत आहेत. सोलापूर, रामटेक मतदारसंघात ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराऐवजी काँग्रेसकडून अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे.

केवळ रामटेकमध्ये नाही, तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातही ऐनवेळी ठाकरेंना धक्का देण्यात आला आहे. खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा जाहीर केला आहे. शिंदे यांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीत कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र मतदानाच्या दिवशीच मविआतील कुरघोडी उघडपणे दिसून आली आहे.

या मतदारसंघात शिवसेनेने जास्त गडबड केली. आम्ही या ठिकाणावरून दोनवेळा निवडून आलो होतो. आम्ही आता त्यांना हे सगळं समजून सांगितले आहे. यामुळे आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा धर्मराज काडादी यांनी असल्याचे सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीत बिघाडी

दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेस अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंना धक्का देतेय, धक्का देण्याचे त्यांचे नियोजन आहे. आता हा धक्का उघड झालाय म्हणून सोलापुरला अपक्ष उमेदवाराला प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि उद्धव ठाकरेंना जोरात धक्का दिला आहे. याचे पडसाद महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसताहेत. उद्धव ठाकरे हे सहन करु शकत नाही. काँग्रेसच्या या बदलत्या भूमिकांमुळे उबाठाचेही महाराष्ट्रातील कार्यकर्ते काँग्रेसला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. तेही काँग्रेसला मतदान करतील, असे वाटत नाही, असा टोला भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.