वृद्ध अभियंत्याची १९ दिवस ‘Digital Arrest’; गमावले तब्बल १० कोटी रुपये

74
वृद्ध अभियंत्याची १९ दिवस ‘Digital Arrest’; गमावले तब्बल १० कोटी रुपये
वृद्ध अभियंत्याची १९ दिवस ‘Digital Arrest’; गमावले तब्बल १० कोटी रुपये

नवी दिल्ली (New Delhi) येथील रोहिणी भागात रहाणार्‍या एका ७७ वर्षीय निवृत्त अभियंत्याला तब्बल १९ दिवस डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) करण्यात आले. या कालावधीत त्याच्याकडून १० कोटी ३० लाख रुपये लुटण्यात आले. पीडित अभियंता म्हणाला की, मला २५ सप्टेंबरला एका कुरिअर आस्थापनाकडून दूरभाष आला होता. आस्थापनाचा प्रतिनिधी असल्याचे भासवून त्या व्यक्तीने मला सांगितले की, माझ्या नावाने मुंबईहून चीनला पाठवलेल्या संशयास्पद पार्सलची माहिती आम्हाला मिळाली आहे. मी मला याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगितल्यावर त्याने मला मुंबई पोलिसांच्या अधिकार्‍याशी बोलण्यास सांगितले. या प्रकाराने मला पुष्कळ मनस्ताप झाला आहे, असे अभियंत्याने सांगितले.

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy 2024 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका कुठे प्रसारित होणार?)

वृद्ध अभियंता पुढे म्हणाला की, मला एक व्हिडिओ कॉल आला. त्यात मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) चिन्हासमोर एक माणूस बसलेला दिसला. त्या अधिकार्‍याने मला पार्सल घोटाळ्याची माहिती देऊन माझ्या बँक खात्याचा तपशील मागितला. नंतर सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून दुसर्‍या व्यक्तीने मला संपर्क केला आणि माझ्यावर आणखी दबाव आणला. कुणी नसलेल्या खोलीत बसून संभाषण करण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला. मला अनेक प्रश्‍न विचारले. मला काही कागदपत्रे दाखवण्यात आली. त्यांपैकी एकावर माझ्या आधार कार्डचा क्रमांक होता.

माझ्या मुलांना किंवा इतर कुणालाही या घटनेसंदर्भात न सांगण्याची धमकी दिली. यानंतर ईडीचा अधिकारी असल्याचे सांगून एकाने मला साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले. यामुळे माझा गोंधळ आणखी वाढला. या संपूर्ण प्रक्रियेला १९ दिवस लागले. या काळात माझ्याकडून ३ टप्प्यांत १० कोटी ३० लाख रुपये ऑनलाईन काढून घेण्यात आले. माझ्या भावाला हा घोटाळा असल्याचे लक्षात आले आणि त्याने रोहिणी जिल्हा पोलीस सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. (Digital Arrest)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.