कोपरी पाचपाखडी मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे (Kedar Dighe) यांच्याविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विदेशी मद्य आणि पैशांनी भरलेली २६ पाकिटे वाटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परंतु हे प्रकरण खोटे असल्याचे दिघे यांनी सांगितले आहे. तसेच भरारी पथकाने कोपरी पोलिस ठाण्यात आमचे वाहन नेले होते. परंतु त्यात काहीही आढळून आले नाही, असे दिघे म्हणाले.
( हेही वाचा : Deepfake Video : RBI Governor Shaktikanta Das यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल!)
कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात (Kopri-Pachpakhadi Assembly constituency) केदार दिघे (Kedar Dighe)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिघे (Kedar Dighe) यांच्याविरोधात शिंदे गटातील एका महिला पदाधिकाऱ्याने कोपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिला पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केदार दिघे (Kedar Dighe) आणि त्यांच्या समर्थकांनी वाहनांमध्ये मद्य आणि दोन हजार रुपये भरलेली २६ पाकिटे आणली होती. त्यामुळे केदार दिघे यांच्यासह कार्यकर्त्यांसह अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kedar Dighe)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community