सोलापुरात Congress ने मविआच्या उमेदवाराचा पाठिंबा काढला; उबाठा गटाने थेट दिली धमकी

55

सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी Congress चे खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी मविआच्या अंतर्गत उबाठा गटाचे उमेदवार अमर पाटील याना पाठिंबा काढून दिला. आणि त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यावर उबाठाचे उपनेते शरद कोळी यांनी शिंदे कुटुंबियांना धमकी दिली.

प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे (Congress) नसून ही भाजपाची बी टीम आहे. प्रणिती शिंदे स्वत:च्या राजकारणासाठी पक्षाचे काम करत नाही. त्यांना लोकसभेला भाजपाने मदत केली अशी चर्चा आहे. त्यामुळे आता भाजपाकडून सुपारी घेऊन त्यांनी अपक्षाला पाठिंबा दिला आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केला आहे.

(हेही वाचा Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मतदान सुरु झाले, तरी महाविकास आघाडीचे एकमत नाही; सोलापूरमध्ये काँग्रेसचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर)

तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असेल. यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर कुठेही खासदार म्हणून निवडून येणार नाही याचा बंदोबस्त शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही. शिवसैनिकांचा केसाने गळा कापण्याचे काम तुम्ही केले आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. प्रणिती शिंदे यांना शिवसैनिकांनी मदत केली नसती तर स्वप्नातही खासदारकी बघता आली नसती. डिपॉझिट जप्त झाले असते. उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी केलेल्या कामामुळे तुम्हाला खासदारकी मिळाली, तुम्ही आभार मानायचे सोडून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केले. यापुढची खासदारकी तुम्ही स्वप्नात बघायची. तुम्ही खासदार होणार नाही याची दक्षता शिवसैनिक घेणार, असेही शरद कोळी यांनी म्हटले. (Congress)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.