Uddhav Thackeray यांच्या विरोधात निवडणुक आयोगात तक्रार

102
Uddhav Thackeray यांच्या विरोधात निवडणुक आयोगात तक्रार
Uddhav Thackeray यांच्या विरोधात निवडणुक आयोगात तक्रार

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दि. १६ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे एक सभा घेतली होती. त्या सभेत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवणारे वक्तव्य केले, असा आरोप करत शिवसेना प्रवक्ते दिलीप अलोणी (Dilip Aloni) यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) तक्रार केली आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी, ठाणे शहर, ओवळा-माजिवडा आणि कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराकरिता घेतलेल्या सभेत धार्मिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Uddhav Thackeray)

( हेही वाचा : Deepfake Video : RBI Governor Shaktikanta Das यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल!

दरम्यान शिवसेना प्रवक्ते दिलीप अलोणी (Dilip Aloni) म्हणाले की, उद्धव ठाकरेंची अशी जाहीर वक्तव्ये रोखण्यासाठी निवडणुक आयोगाने त्यांच्यावर सहा वर्षासाठी निवडणूक क्षेत्रात येण्यास बंदी करावी. त्यात निवडणूक आयोगाने ठाणे निवडणूक विभागाला उद्धव ठाकरेंच्या संबंधित वक्तव्याचा २४ तासात अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. (Uddhav Thackeray)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.