गेल्या पाच वर्षातील अडिच वर्षाचा कारभार महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे. २०१९ साली जनमताचा अनादर झाला, हे मतदार विसरले नसून राज्याची दशा कुणी केली आणि राज्याला दिशा कुणी दिली हे जनतेला माहित आहे. त्यामुळे कल्याणकारी योजना आणि विकासकामांच्या जोरावर महाराष्ट्रातील मतदार महायुतीलाच बहुमताने निवडून देतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाण्यात व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी लता शिंदे(Lata Shinde), वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि स्नुषा वृषाली शिंदे यांनी देखील मतदानासाठी उपस्थित होते. (CM Eknath Shinde)
( हेही वाचा : Assembly Election : महानगरपालिका आयुक्तांची वेबकास्टिंग संनियंत्रण कक्षाला भेट; मतदान केंद्रातील प्रक्रियेचा घेतला आढावा)
ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्यासमोर शिवसेना उबाठा पक्षाचे केदार दिघे (Kedar Dighe) यांचे आव्हान आहे. त्यामुळे शिंदेंच्या विजयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. दि. २० नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाण्यातील वागळे इस्टेट मधील एलिमेंट आयटी पार्क मतदान केंद्रांवर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तसेच महायुती सरकार सत्तेत आल्यास आम्ही लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करू. तसेच जनता महायुतीला, विकासाला भरभरून मतदान करून लोकशाही बळकट करणार आहे, असे शिंदे (CM Eknath Shinde)म्हणाले.
हेही पाहा :