Jharkhand मध्ये दोन्ही आघाडी बहुमताजवळ; अपक्ष ठरणार किंगमेकर

138
Jharkhand मध्ये दोन्ही आघाडी बहुमताजवळ; अपक्ष ठरणार किंगमेकर
Jharkhand मध्ये दोन्ही आघाडी बहुमताजवळ; अपक्ष ठरणार किंगमेकर

झारखंडमध्ये (Jharkhand) विधानसभा निवडणुकीसाठी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. झारखंडमध्ये ८१ मतदारसंघ असून कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळवण्यासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. झारखंडमध्ये एनडीए (NDA) आघाडीला सर्वाधिक जागा मिळू शकतात. जेएमएमच्या नेतृत्त्वाखालील इंडी आघाडी दुसऱ्या स्थानावर राहू शकते. झारखंडमध्ये काँग्रेसचे नुकसान होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

( हेही वाचा : Assembly Election 2024 : मतदानावेळी कुठे राडा तर कुठे पैशांवरून गोंधळ

दरम्यान झारखंड विधानसभेत जेएलकेएमसारखे स्थानिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारही सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भुमिका बजावू शकतात. ठोकळमानाने पाहिल्यास एनडीए (NDA) आघाडीला ३७-४० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इंडी आघाडीला ३६- ३९ जागा मिळू शकतात. त्यामुळे कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, अशी चिन्ह आहेत.

कोणाला किती जागा मिळू शकतात?

राजकीय विश्लेषक, पॉलिटिकल एक्सपर्ट, वरिष्ठ पत्रकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए (NDA) आघाडीतील भाजपाला झारखंडमध्ये (Jharkhand) २९-३२, ऑल झारखंड स्टुडंटस् युनियनला (AJSU Party) ३- ५ जागा मिळू शकतात. जेडीयूला १-२ आणि लोक जनशक्ति पार्टीला १ जागा मिळू शकते. तर इंडी आघाडीतील झारखंड मुक्ति मोर्चाला २५-२९, काँग्रेसला (Congress) ६-८ जागा मिळू शकतात. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी)ला १-२ आणि राष्ट्रीय जनता दलाला ०-१ जागा मिळू शकतात.

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडणुक रिंगणात?

झारखंड (Jharkhand) विधानसभेत भाजप ६८ जागांवर, ऑल झारखंड स्टुडंटस् युनियन १० जागांवर, जेडीयू २ आणि लोक जनशक्ति पार्टी एक जागा लढवत आहे. तर झारखंड मुक्ति मोर्चा ४३ जागा, काँग्रेस ३० आणि आरजेडी ६ जागा लढवत आहे. तसेच सीपीआय (एमएल) ४ जागांवर निवडणुक लढवत आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.