Assembly Election : धुळ्यात ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी मतदान केंद्रावर आल्या

एका बाजूला मुसलमान एक गठ्ठा मतदान करताना संघटितपणे घराबाहेर पडत असतात, तसे हिंदूंही धर्मासाठी संघटित झाले असून तेही यासाठी मतदान करण्याकरता एकत्रितपणे घराबाहेर पडू शकतात, असा संदेश यानिमित्ताने या महिलांनी दिला आहे.

385
बहुचर्चित महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) बुधवार, २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. राज्यभरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६६ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली, मात्र अंतिम आकडेवारी रात्री उशिरा येणार आहे. मात्र या निवडणुकीत अनेक विषय चर्चेत आल्या, मतदानाच्या दिवशीही एक गोष्ट अनेकांचे लक्ष केंद्रित करत होती. धुळ्यात तब्बल ५०० महिला जय श्रीराम अशा घोषणा देत मतदान केंद्रापर्यंत पोहचल्या.
धुळ्यातील एका मतदानकेंद्राकडे ५०० महिला मतदार रस्त्यावरून चालताना जय श्रीराम अशा घोषणा देत येत होत्या. यातील बहुतांश महिलांनी भगव्या रंगाची साडी नेसली होती. अशा रीतीने या महिलांनी आपण मतदान हिंदू धर्मासाठी करत आहोत, असा संदेश दिला. यामध्ये तरुण मुलींचाही समावेश होता. एका बाजूला मुसलमान एक गठ्ठा मतदान करताना संघटितपणे घराबाहेर पडत असतात, तसे हिंदूंही धर्मासाठी संघटित झाले असून तेही यासाठी मतदान करण्याकरता एकत्रितपणे घराबाहेर पडू शकतात, असा संदेश यानिमित्ताने या महिलांनी दिला आहे. (Assembly Election)

महिलांची मते निर्णायक 

या निवडणुकीत (Assembly Election) महिला मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे दिसल्या. महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली, ५ महिन्यांचे हफ्तेही महिलांना दिले. त्यामुळे महिला मतदार सरकारला पाठिंबा देण्यासाठीच मतदानासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्या, असे विश्लेषक सांगत आहेत. जळगावमध्ये ११ मतदारसंघात ५७.४३ टक्के महिलांनी मतदान केले, तर पुरुषांनी ५४.७१ टक्के मतदान केले. पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक प्रमाणात मतदान केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.