Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात सरासरी ६६ टक्क्यांपर्यंत मतदान

129
Maharashtra Assembly Election : सट्टा बाजारचा कौल कोणाला? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानाची (Maharashtra Assembly Election) टक्केवारी वाढली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर ही आकडेवारी सरासरी ६६ टक्के झाल्याची समजते.

(हेही वाचा Assembly Election : आचारसंहिता भंगाच्या १०१३४ तक्रारी निकाली; ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त)

गेल्या वेळी २०१९ च्या विधानसभेला ६१.४४ टक्के मतदान झाले होते. जादाचे झालेले हे मतदान कोणाच्या पारड्यात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात की सत्ताधाऱ्यांच्या बाजुने असेल याचे अंदाज आता लावले जात आहेत. मात्र तरीही या आकडेवारीत काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुंबईतही मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसले. २०१९ मध्ये मुंबईत ५०.६७ टक्के मतदान झाले होते, यावेळी ते सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. (Maharashtra Assembly Election)

मतदारांना सुट्टी, फुकट अनुदान, फुकटचे पैसे किंवा अशा योजना देण्याऐवजी एखादा कडक कायदा बनवून मतदान करणे बंधनकारक करावे आणि त्या आधारावरच सरकारी योजनांचा लाभ, सर्व प्रकारच्या कर्जांची आकारणी किंवा सूट, सरकारी प्रमाणपत्रांचे किंवा लायसन्सचे नूतनीकरण, सर्व प्रकारच्या नोंदणी शुल्कात सूट वगैरे ठरवावे. उलटपक्षी जे लोक मतदान करणार नाहीत, त्यांच्यावर विशेष दंड आकारावा. मतदारांना मतदान केल्याचे प्रमाणपत्र किंवा काहीतरी ॲानलाईन पावती मिळवून द्यावी. एखादा असा कायदा कशा प्रकारे कार्यान्वित करता येईल, याचा विचार करून त्याप्रकारची व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. जनजागृती करून अनेक वर्ष झाली अनेक निवडणुका झाल्या पण लोक सुधारले नाहीत त्यासाठी फक्त कायद्याचा बडगा आणि धाक हवाच, खास करून त्याशिवाय स्वतःला शहरी सुशिक्षित समजणारे लोकं सुधारणार नाहीत.
– पुरुषोत्तम कांबळे, दादर, मुंबई

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.