स्पॅम कॉल्स आणि एसएमएस रोखण्यासाठी TRAI सतर्क, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

46
स्पॅम कॉल्स आणि एसएमएस रोखण्यासाठी TRAI सतर्क, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई
स्पॅम कॉल्स आणि एसएमएस रोखण्यासाठी TRAI सतर्क, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

ट्राय (TRAI) अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (Telecom Regulatory Authority of India) स्पॅम कॉल्स आणि एसएमएस म्हणजेच ग्राहकांची फसवणूक करणारे कॉल्स आणि लघुसंदेश यांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ट्रायच्या या कठोर उपायांमुळे स्पॅम कॉल्सच्या तक्रारींचे प्रमाण कमी होताना दिसत आहे: ट्रायने दि. १३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार कोणतीही संस्था नियमांचे उल्लंघन करून जाहिरातींसाठी ग्राहकांना दूरध्वनी करत असल्याचे आढळून आल्यास अशा संस्थेला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. यामध्ये दूरसंचारसंबंधी सर्व जोडण्या तोडणे, अशा संस्थेचे नाव दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकणे आणि या कालावधीत कोणत्याही नव्या स्त्रोतांच्या वितरणावर बंदी अशा शिक्षांचा समावेश आहे.

दरम्यान ट्रायकडून (TRAI) हे निर्देश जारी झाल्यानंतर, ॲक्सेस प्रोव्हायडर्स म्हणजेच प्रवेश प्रदात्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या कृतींमुळे स्पॅम कॉल्ससंबंधीच्या (Spam calls) तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. ॲक्सेस प्रोव्हायडर्सनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२४ मध्ये नोंदणी नसलेल्या क्रमांकांविरुद्ध १.८९ लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या तर सप्टेंबर २०२४ मध्ये १.६३ लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या.(ऑगस्ट२०२४ मधील तक्रारींपेक्षा १३% कमी तक्रारी) तर ऑक्टोबर २०२४ मध्ये १.५१ लाख तक्रारी नोंदल्या गेल्या. (ऑगस्ट२०२४ मधील तक्रारींपेक्षा २०% कमी तक्रारी)

( हेही वाचा : Winter : महाराष्ट्रात थंडीचा कडाका; निफाडमध्ये ११ अंश तापमानाची नोंद)

संदेशांचा उगम शोधण्याच्या वाढीव क्षमतेच्या अंमलबजावणीमध्ये उत्तम प्रगती: संदेशांचा उगम शोधण्याच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी. टीआरएआयने दि. २० ऑगस्ट रोजी निर्देश जारी करून प्रेषक/मुख्य संस्थेतर्फे प्राप्तकर्त्यांना पाठवण्यात येणाऱ्या सर्व संदेशांचे उगम शोधता येणे दि. १ नोव्हेंबरपासून अनिवार्य असेल. सर्व ॲक्सेस प्रोव्हायडर्सनी तेव्हापासून तांत्रिक उपाययोजना लागू केल्या आहेत. मात्र, तांत्रिक अद्ययावतीकारणासाठी लागणारा स्थित्यंतर कालावधी तसेच मुख्य संस्था (पीईज)आणि टेलीमार्केटर्स (टीएम्स) यांच्यातील श्रुंखला घोषणा यांचा विचार करून ट्रायने (TRAI) दि. २८ ऑक्टोबर रोजी नवे निर्देश जरी करून हा कालावधी दि. ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवला.

पीईज तसेच आरटीएम्स यांनी हाती घेतलेल्या या उपाययोजना आणि कार्यवाहीबाबत जनजागृती करण्यासाठी ट्रायच्या (TRAI) अधिपत्याखाली वेबिनार्सचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी पहिले वेबिनार दि. १२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले.रिलायन्स जिओ इन्फोकॉम या कंपनीसह संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात रिझर्व्ह बँक, सेबी, पीएफआरडीए आणि आयआरडीएआय यांच्यातर्फे नियमन केल्या जाणाऱ्या संस्थांचे १००० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. याच मालिकेतील दुसरे वेबिनार दि. १९ नोव्हेंबर रोजी पार पडले आणि व्होडाफोन आयडिया कंपनीच्या सहकार्यासह आयोजित या कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग तसेच रिझर्व्ह बँक, सेबी, पीएफआरडीए (PFRDA) आणि आयआरडीएआय यांच्यातर्फे नियमन केल्या जाणाऱ्या संस्था यांचे ८०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यापुढील वेबिनार दि.२५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून टाटा टेली सर्व्हिसेसच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग तसेच रिझर्व्ह बँक, सेबी, पीएफआरडीए आणि आयआरडीएआय यांच्यातर्फे नियमन केल्या जाणाऱ्या संस्था, नॅस्कॉम, ग्राहक सक्षमीकरणासाठीची फिनटेक संस्था (एफएसीई) तसेच इतर अनेक संस्थांना या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.(TRAI)

या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून, तेरा हजाराहून अशी पीईजनी यापूर्वीच संबंधित ॲक्सेस प्रोव्हायडर्ससोबतच्या साखळ्यांची नोंदणी केली असून आणखी काही नोंदण्या करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ॲक्सेस प्रोव्हायडर्सनी आवश्यक बदल अजूनही लागू न करणाऱ्या सर्व पीईजना तसेच आरटीएम्सना ताकीदवजा नोटीसा पाठवल्या आहेत. सर्व पीईज तसेच टीएम्सना प्राधान्यक्रमाने आपापल्या साखळ्यांची माहिती जाहीर करण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ठराविक टेलीमार्केटर साखळीशी संबंधित नसलेला संदेश आता इच्छित प्राप्तकर्त्याला पोहोचणार नाही.(TRAI)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.