Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा…”, एक्झिट पोलच्या अंदाजांवर Devendra Fadnavis काय म्हणाले ?

104
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: "जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा...", एक्झिट पोलच्या अंदाजांवर Devendra Fadnavis काय म्हणाले ?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) २० नोव्हें. रोजी मतदान पार पडले. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे (Exit polls) अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोल्सने महायुतीला (Mahayuti) जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला असला तरी काही एक्झिट पोल्सनुसार महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर आणि अपक्ष आणि इतर पक्षाच्या हाती सत्तेची सूत्र जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (Devendra Fadnavis)

एक्झिट पोल्सचा अंदाज काय ? (Devendra Fadnavis)
चाणक्य, मॅट्रीक्स, पोल डायरी, पीपल्स पल्स, पोलस्टर एक्झिट पी-एमएआरक्यू यासह अजून काही एक्झिट पोलने वर्तवलेल्या आकडेवारीनुसार भाजपा राज्यात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये पोल डायरीनुसार भाजपाला ७७ ते १०८ जागा, मॅट्रीक्सनुसार भाजपाला ८९ ते १०१ जागा, चाणक्यनुसार भाजपा ९० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया (Devendra Fadnavis)

या एक्झिट पोल्सनी दिलेल्या अंदाजावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा-तेव्हा त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होतो. (BJP) यावेळी देखील आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार मतदानाची आकडेवारी चांगल्या प्रकारे वाढली आहे. त्यामुळे मला वाटतं की, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला त्याचा नक्कीच फायदा होईल.” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.