Exit Poll 2024: लोकसभेला एक्झिट पोलचा अंदाज चुकला, आता विधानसभेला काय होणार ?

80
Exit Poll 2024: लोकसभेला एक्झिट पोलचा अंदाज चुकला, आता विधानसभेला काय होणार ?
Exit Poll 2024: लोकसभेला एक्झिट पोलचा अंदाज चुकला, आता विधानसभेला काय होणार ?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) २० नोव्हें. रोजी मतदान पार पडले. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे (Exit Poll 2024) अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोल्सने महायुतीला (Mahayuti) जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला असला तरी काही एक्झिट पोल्सनुसार महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर आणि अपक्ष आणि इतर पक्षाच्या हाती सत्तेची सूत्र जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (Exit Poll 2024)

एग्झिट पोल फिरणार की सत्ताधाऱ्यांना कौल मिळणार?

या एग्झिट पोल्समुळे (Exit Poll 2024) सत्ताधाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी महाराष्ट्रात एग्झिट पोलचे अंदाज बरोबर उलटे झाल्याचं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यानं पाहिलं आहे. लोकसभा निकालांचे पडसाद विधानसभा निवडणुकांवर पडतील, असे अंदाज वर्तवले जात होते. पण एग्झिट पोलमध्ये (Exit Poll 2024) मात्र चित्र वेगळंच दिसून येत आहे. त्यामुळे हे एग्झिट पोलदेखील फिरणार की सत्ताधाऱ्यांना कौल मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल.

मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती?
पिपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार (Exit Poll 2024) मुख्यमंत्री म्हणून, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ३५.८ टक्के लोकांनी पहिली पसंती दर्शवली आहे. तर २१.७ टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ११.७ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे तर अजित पवार यांना २.३ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. नाना पटोले यांना १.२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.