Border – Gavaskar Trophy 2024 : पर्थ कसोटीत कसा असेल भारताचा अंतिम अकरा जणांचा संघ?

81
Border - Gavaskar Trophy 2024 : पर्थ कसोटीत कसा असेल भारताचा अंतिम अकरा जणांचा संघ?
Border - Gavaskar Trophy 2024 : पर्थ कसोटीत कसा असेल भारताचा अंतिम अकरा जणांचा संघ?
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पर्थ कसोटीला आता २४ तासांहून कमी वेळ उरला आहे. चर्चा सुरू झाली आहे ती, या कसोटीसाठीच्या अंतिम संघाची. रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमरा संघाचं नेतृत्व करेल हे स्पष्ट आहे. कर्णधार म्हणून आपल्या दुसऱ्याच कसोटीत बुमरासमोर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. आधीच घरच्या मैदानावर फ्लॉप ठरलेल्या आधाडीच्या फळीची मोट कशी बांधायची हा पहिली प्रश्न आहे. विराट आणि के. एल. राहुल हे संघातील दोन सगळ्यात अनुभवी फलंदाज आहेत. पण, दोघंही फॉर्मशी झुंजतायत. अशावेळी भारतीय संघ अंतिम अकरामध्ये कुणाला आणि कुठल्या क्रमांकावर खेळवतो याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.  (Border – Gavaskar Trophy 2024)

संघ प्रशासनाच्या डोक्यात नेमकं काय चाललंय याचा अंदाज सरावाकडे बघून बांधता येऊ शकतो.

(हेही वाचा- Raj Thackeray किंगमेकर ठरणार? मनसेला किती जागा मिळणार ? काय आहे एक्झिट पोल्सचा अंदाज?)

भारतीय संघाच्या सराव सत्रात देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, के. एल. राहुल, यशस्वी जयसवाल स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसले. यष्टीरक्षक ध्रुव जुरेल गलीमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. या फोटोवरून असे दिसते की शुभमन गिलच्या जागी देवदत्त पडिक्कल खेळेल तर के.एल. राहुल यशस्वी जयसवालसह डावाची सुरुवात करेल. जुरेलही मधल्या फळीत फलंदाज म्हणून खेळू शकतो. भारतीय संघ व्यवस्थापनाने पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांचा अंतिम अकरामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. (Border – Gavaskar Trophy 2024)

ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने प्रभावित केले. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्याने दोन डावात ८० आणि ६० धावा केल्या. अशा स्थितीत तो संघात फक्त फलंदाज म्हणून खेळू शकतो. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही जुरेलचं समर्थन केलं आहे. तो या सामन्यात सर्फराज खानची जागा घेऊ शकतो. इतकंच नाही तर हर्षित राणा किंवा नितिश रेड्डी यांच्यापैकी एकाला पदार्पणाची संधीही मिळू शकते. फिरकीपटू म्हणून रवींद्र जाडेजावर विश्वास टाकला जातो की, युवा वॉशिंग्टन सुंदरवर हे पाहावं लागले. (Border – Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा- Assembly Election 2024 : राज्यात ६५.११ मतदान, ३० वर्षानंतर राज्यात मतदारांचा सर्वाधिक प्रतिसाद)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) , आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.