- सुप्रिम मस्कर
वसई विरार महापालिका क्षेत्रात (Vasai Virar Municipal Corporation) पाणीटंचाईची समस्या अनेकांना भडसावत असते. त्यामुळे माहितीच्या अधिकाराअंतर्गत वसई- विरार (Vasai-Virar) महापालिका क्षेत्रातील पाण्याची मागणी आणि सद्या उपलब्ध पाणीसाठा यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडून माहिती मागवण्यात आली. यामध्ये वसई, विरार, नालासोपारा या तिन्ही भागात पूर्व\ पश्चिम विभागात लोकांना लागणारी पाण्याची आवश्यकता आणि नागरिकांना केला जाणारा लीटरनुसार होणार पुरवठा अशी माहिती मागविण्यात आली होती. मात्र पाणीपुरवठा विभागाने संबंधित माहिती कागदपत्र स्वरुपात नसल्याचे सांगत ठोकळ माहिती दिली आहे. (Vasai-Virar)
माहितीच्या अधिकार अंतर्गत मागितलेल्या माहितीनुसार वसई-विरार महापालिकेच्या (Vasai Virar Municipal Corporation) पाणी पुरवठा विभागाने सांगितले की, २०२४ या वर्षी वसई-विरार महापालिका क्षेत्रात अंदाजे २४ लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे वसई,विरारमधील (Vasai-Virar) २४ लाख लोकसंख्येकडून ३७२ दशलक्ष लीटर पाण्याची मागणी केली जाते. तसेच वसई विरारला सर्व स्त्रोतातून सद्या ४०० दक्षलक्ष लीटर पाणी पुरवठा होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध असूनही पाण्याची मागणी कमी असतानाही पाणीटंचाई का निर्माण होते? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
( हेही वाचा : Assembly Election 2024 : राज्यात ६५.११ मतदान, ३० वर्षानंतर राज्यात मतदारांचा सर्वाधिक प्रतिसाद)
परंतु तरीही नालासोपारा, वसई, विरार (Vasai-Virar) इथल्या काही भागात अद्याप टँकरने पाणीपुरवठा का करावा लागतो? असा मोठा प्रश्न निर्माण होतो. वसई-विरारला मार्च २०२४ मध्ये पाणीटंचाईमुळे प्रतिदिन २३ टँकरद्वारे वसई विरारच्या (Vasai-Virar) पूर्वेच्या भागाला पाणीपुरवठा केला जात होता. यावेळी पूर्वेकडील भागात पालिकेच्या पाण्याच्या जलवाहिन्या पोहचल्या नसल्याचे कारण पालिका प्रशासनाने दिले होते. मात्र अनेक वर्ष वसई-विरार (Vasai-Virar) शहरात हीच समस्या असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाळ्यात कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदल, सागपाडा, गीदराई पाडा, सातीवली, गोखीवरे, नागिनदास पाडा, मोरेगाव, मनवेलपाडा, लक्ष्मीनगर या भागात कमी पाणीसाठा असल्याची कारणे देऊन पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी नियमित पाणीपुरवठ्यासाठी टाळाटाळ करतात. आजही अनेक भागात टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे पर्याप्त पाणीसाठा असून ही पाणीपुरवठा नियमित का नाही? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. यात टँकर माफीयांना (Tanker Mafia) अभय देण्याचा प्रयत्न होतोय का? सत्ताधारी स्वत:च्या मालकीच्या इमारतींना सर्रास पाणीपुरवठा करतात का? असाही प्रश्न निर्माण होतोय. (Vasai-Virar)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community