Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शासकीय आणि खासगी रुग्णालयातील रुग्ण सोईसुविधांअभावी मतदानाला मुकले!

53
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शासकीय आणि खासगी रुग्णालयातील रुग्ण सोईसुविधांअभावी मतदानाला मुकले!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शासकीय आणि खासगी रुग्णालयातील रुग्ण सोईसुविधांअभावी मतदानाला मुकले!

विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना तसेच जनजागृती करण्यात आली परंतु, जे मतदार आपल्या आरोग्याच्या समस्येमुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत, ते मात्र आपल्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहिले आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Assembly Election 2024 : माहीम विधानसभेतील मतदानाचा टक्का वाढला, शहरातील सर्वाधिक मतदान माहीममध्ये)

२० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज होती. मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तसेच मतदानाच्या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी दिव्यांग तसेच ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वयोवृद्ध मतदारांच्या घरी जाऊन प्रशासनाने मतदान प्रक्रियादेखील राबविली. परंतु रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांच्या मतदानासाठी कोणतीही उपाययोजना प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेली नसल्याचे बोलले जात आहे.(Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

ELECTORAL EDGE च्या एक्झिट पोलनूसार कोणाला किती जागा मिळणार? (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
भाजप- 78
काँग्रेस- 60
एनसीपी-एसपी- 46
शिवसेना-उबाठा- 44
शिवसेना- 26
एनसीपी-अजित पवार- 14
मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष इतर- 20

मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
पिपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार (Exit Poll 2024) मुख्यमंत्री म्हणून, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ३५.८ टक्के लोकांनी पहिली पसंती दर्शवली आहे. तर २१.७ टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ११.७ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे तर अजित पवार यांना २.३ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. नाना पटोले यांना १.२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.