Rafael Nadal : नदाल नसला तरी त्याचे हे विक्रम करणार टेनिस कोर्टवर राज्य

40
Rafael Nadal : राफेल नदालचे व्यावसायिक कमाईचे विक्रम; 'ही' आहे बक्षिसांची आयुष्यभराची कमाई
  • ऋजुता लुकतुके

३८ वर्षीय राफेल नदाल शुक्रवारी आपला अखेरचा व्यावसायिक सामना खेळला. त्याच्या २५ वर्षांहून अधिकच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला. तेव्हापासून सोशल मिडियावर क्ले कोर्टचा बादशाह असलेल्या या लाडक्या खेळाडूला मानवंदना दिली जात आहे. २२ ग्रँडस्लॅम (सर्वाधिक १४ वेळा फ्रेंच ओपन जिंकण्याच्या विक्रमासह) नावावर असलेल्या नदालला डेव्हिस चषकाच्या शेवटच्या सामन्यात मात्र नेदरलँड्सच्या बोटिक व्हॅन डी समोर नदालचा ४-६ आणि ४-६ असा सरळ सेटमध्ये पराभव झाला. शिवाय स्पेननेही ही लढत गमावल्यामुळे नदालला डेव्हिस चषकात यंदा पुन्हा खेळण्याची संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झालं. नदालच्या निवृत्तीवर शिक्कामोर्तब झालं. (Rafael Nadal)

 नदालने गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. डेव्हिस चषकातील सामना शेवटचा असेल असे त्याने सांगितले होते. मंगळवारी नदालचा सामना ८० व्या क्रमांकाच्या बोटिक व्हॅन डी झांडस्चल्पशी झाला. बोटिकने या सामन्यात सुरुवातीपासूनच नदालला कडवी टक्कर दिली. त्याने पहिल्या सेटमध्ये नदालचा ६-४ अशा फरकाने पराभव केला. दुसऱ्या सेटमध्येही बोटिकने ३-२ अशी आघाडी घेतली होती, पण नदालने पुनरागमन करत ४-३ अशी आघाडी घेतली. पुढे हा सेटही ६-४ ने जिंकत बोटिकने विजय मिळवला. शिवाय स्पेनचा ३-२ ने पराभव झाल्यामुळे नदालला आता डेव्हिस चषकात यंदा पुन्हा संधी मिळणार नाही हे स्पष्ट झालं.  (Rafael Nadal)

 डेव्हिस चषकातील शेवटचा सामना खेळण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना नदाल भावूक दिसला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तो व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. आपला शेवटचा सामना नदालला जिंकता आला नाही. पण, आपल्या कारकीर्दीत २२ ग्रँडस्लॅम जिंकून त्याने दिग्गज खेळाडूचा मान यापूर्वीच मिळवला आहे. शिवाय फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची सर्वाधिक १४ विजेतेपदं त्याच्या नावावर आहेत. (Rafael Nadal)

  • नोव्हाक जोकोविच – २४

  • राफेल नदाल- २२

  • रॉजर फेडरर – २०

  • पीट सॅम्प्रास- १४

  • रॉय इमर्सन – १२

नदालने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली आहे. यामध्ये त्याने त्याच्या अलीकडच्या काळातील संघर्ष आणि खेळताना त्याच्या शरीरावर झालेला परिणाम याबद्दल सांगितले. (Rafael Nadal)

(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy 2024 : पर्थ कसोटीत कसा असेल भारताचा अंतिम अकरा जणांचा संघ?)

नदाल म्हणतो, ‘माझी शेवटची स्पर्धा डेव्हिस चषकाची असेल. देशाचं प्रतिनिधित्व करणार असल्यामुळे ही खुश आहे. माझा विश्वास आहे की व्यावसायिक टेनिसपटू म्हणून माझ्या पहिल्या विजयाच्या जो आनंद मला झाला होता, त्यानंतर मी ते वर्तुळ पूर्ण करण्याच्या टप्प्यावर आता आहे. माझा पहिला डेव्हिस चषक अंतिम सामना २००४ मध्ये झाला. आज मी तिथेच उभा आहे. आणि माझा शेवटचा सामना असणार आहे. मी स्वतःला सुपर सुपर लकी समजतो की हे सगळं मला अनुभवायला मिळालं.’  (Rafael Nadal)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.