- ऋजुता लुकतुके
भारतीय खेळाडू आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना महत्त्व देत देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचं टाळतात असा आरोप भारतीय खेळाडूंवर अनेकदा होतो. याच हंगामात ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर त्याचसाठी कारवाई करण्याची वेळही बीसीसीआयवर आली. त्यानंतर बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळावं अशी सक्त ताकीदही बीसीसीआयने खेळाडूंना दिली आहे. सचिव जय शाह यांनी जाहीरपणे एका कार्यक्रमात तसं म्हटलं होतं. (Hardik Pandya)
आता खेळाडूही या सूचनेचं पालन करताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत हार्दिक पांड्याचा भारतीय संघात समावेश नाही. या मोकळ्या वेळेत हार्दिक पांड्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा खेळणार आहे. ८ वर्षांनंतर ही देशांतर्गत स्पर्धा हार्दिक खेळणार असून आपला भाऊ कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली तो बडोदे संघातून खेळणार आहे. येत्या २३ नोव्हेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियात जेद्दाह इथं आयपीएलचा लिलावही पार पडणार आहे. त्यापूर्वी चमकदार कामगिरी करून संघ मालकांच्या नजरेसमोर येण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असणार आहे. (Hardik Pandya)
(हेही वाचा – Assembly Election 2024 : सत्ता कुणाचीही असो, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला रिपीट होणार)
HARDIK PANDYA WILL PLAY IN SYED MUSHTAQ ALI FOR BARODA 🔥
– Hardik will be playing under his brother, Krunal Pandya. [Sahil Malhotra from TOI] pic.twitter.com/3XIqplStrV
— Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2024
कृणालच्या नेतृत्वाखाली बडोद्याने २०२३-२४ च्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण, पंजाबकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. हार्दिकचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन संघासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. हार्दिक शेवटचा रणजी करंडकाचा सामना २०१८-१९ मध्ये बडोद्याकडून खेळला होता. तो अखेरचा जानेवारी २०१६ मध्ये सय्यद मुश्ताक अली करंडकात खेळला होता. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागल्यापासून तो या स्पर्धेत खेळलेला नाही. (Hardik Pandya)
गेल्या महिन्यात हार्दिकला मुंबई इंडियन्सने कायम ठेवले असून पुढील हंगामात तो कर्णधार म्हणूनही कायम राहील. दरम्यान, कृणालला लखनऊ सुपर जायंट्सने सोडले आहे आणि तो मेगा लिलावाचा भाग असेल. बडोद्याने देशांतर्गत हंगामात दमदार सुरुवात केली असून रणजी ट्रॉफीच्या पहिल्या टप्प्यात २७ गुणांसह अ गटात अव्वल स्थान पटकावले आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे बऱ्याच दिवसांपासून एकत्र खेळलेले नाहीत. दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्समध्ये अनेक वर्षे एकत्र खेळले पण नंतर दोघेही वेगवेगळ्या फ्रँचायझींमध्ये गेले. मात्र, गुजरात टायटन्समध्ये २ हंगाम घालवल्यानंतर हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून बडोद्याचा संघ गुजरात, उत्तराखंड, तामिळनाडू, त्रिपुरा, सौराष्ट्र, कर्नाटक आणि सिक्कीमसह ब गटात आहे. (Hardik Pandya)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community