सत्ता स्थापनेसाठी अपक्ष उमेदवारांची गरज लागेल का? Devendra Fadnavis म्हणाले…

113
सत्ता स्थापनेसाठी अपक्ष उमेदवारांची गरज लागेल का? Devendra Fadnavis म्हणाले...
सत्ता स्थापनेसाठी अपक्ष उमेदवारांची गरज लागेल का? Devendra Fadnavis म्हणाले...

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) २० नोव्हें. रोजी मतदान पार पडले. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे (Exit polls) अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोल्सने महायुतीला (Mahayuti) जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला असला तरी काही एक्झिट पोल्सनुसार महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर आणि अपक्ष आणि इतर पक्षाच्या हाती सत्तेची सूत्र जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा-भाजपाचा अपक्षांच्या बाबतीत विचार काय? Chandrashekhar Bawankule म्हणाले…)

नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “महाराष्ट्र मध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजपर्यंतचा अनुभव पाहता जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढली आहे, तेव्हा तेव्हा भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन होईल. राज्यात वाढलेली मतदानाची टक्केवारी ही महिलांची आहे. आम्ही मतदारसंघातील बुथ वरील आकडेवारी जमा केली आहे. आणि प्राथमिक फीडबॅक नुसार महिलांची टक्केवारी वाढलेली आहे. “

(हेही वाचा-Jammu and Kashmir मध्ये घुसखोरी प्रकरणी एनआयएची ८ ठिकाणी छापेमारी!)

सत्ता स्थापनेसाठी अपक्ष उमेदवारांची गरज लागेल का? त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. मात्र, यावर भारतीय जनता पक्ष आणि आम्ही अद्याप कोणाशी संपर्क साधलेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी नेहमीच अदानींवर आरोप करतात. त्यात काय नवीन काहीच नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा-Raj Thackeray किंगमेकर ठरणार? मनसेला किती जागा मिळणार ? काय आहे एक्झिट पोल्सचा अंदाज?)

मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. निकाल आल्यानंतर तिन्ही पक्ष एकत्र बसून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. साधारणपणे मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीने वाढली आहे. त्यात सरकारच्या बाजूने लोकांचा कल असू शकतो.” असं फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.