केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 2025 च्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी 15 फेब्रुवारी 2025 पासून या परीक्षा सुरू होणार आहेत. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध आहे. (CBSE Board Exam 2025)
(हेही वाचा – Rafael Nadal : नदाल नसला तरी त्याचे हे विक्रम करणार टेनिस कोर्टवर राज्य)
इयत्ता दहावीच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त, बोर्डाने सीबीएसईने इयत्ता बारावीच्या परीक्षेची तारीख देखील घोषित केली आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी सुरू होणार आहेत. सीबीएसईने सांगितले की, “विद्यार्थ्याने निवडलेल्या कोणत्याही 2 परीक्षा एकाच तारखेला होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी 40 हजारांहून जास्त विषयांचे संयोजन टाळून तारीख पत्रक तयार केले गेले आहे. सीबीएसईने परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे 86 दिवस आधी वेळापत्रक जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 23 दिवस आधीच वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. (CBSE Board Exam 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community