- प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी (२१ नोव्हेंबर) आम आदमी पक्षातील निष्ठावंतांना डावलून 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यातील सहा उमेदवार भाजपा आणि कॉंग्रेसमधून आले आहेत, हे येथे उल्लेखनीय. आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप केलेली नाही. परंतु, भाजपा आणि कॉंग्रेसच्या तुलनेत आप पुढे असल्याचे दाखविण्याकरिता केजरीवाल यांनी ही यादी जाहीर केली आहे. (Delhi Assembly Election)
आपच्या 11 उमेदवारांमध्ये ब्रह्मसिंह तंवर (छतरपूर), बीबी त्यागी (लक्ष्मीनगर) आणि अनिल झा (किराडी), झुबेर चौधरी (सीलमपूर), वीरसिंग धिंगाण (सीमापुरी), सुमेश शौकीन (मटियाला), दीपक सिंघला (विश्वासनगर), सरिता सिंग (रोहतास नगर), रामसिंग नेता (बदरपूर), गौरव शर्मा (घोंडा) आणि मनोज त्यागी (करावलनगर) यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, ब्रह्मसिंह तंवर, बीबी त्यागी आणि अनिल झा हे नुकतेच भारतीय जनता पक्ष सोडून आपमध्ये सामील झाले होते. तर, झुबेर चौधरी, वीरसिंग धिंगाण आणि सुमेश शौकीन हे कॉंग्रेसमधून आले आहेत. ही मंडळी आपसोडून जाण्याची भीती असल्यामुळे केजरीवाल यांनी त्यांची नावे उमेदवारांच्या पहिल्या यादीत समाविष्ट केली असल्याची चर्चा रंगली आहे. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – VIT Vellore Fees : व्हीआयटीमध्ये कोर्ससाठी ४ वर्षांसाठी एकूण फी किती आहे?)
विधानसभेच्या निवडणुकीत आपला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. मुळात, दिल्लीत दहा वर्षांपासून आपची सत्ता आहे. अशात आप सरकारच्या विरोधात सत्ताविरोधी लाट बघायला मिळत आहे. सध्या आपचे 62 आमदार आहेत. यातील किमान 25 ते 30 आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे. शिवाय, भाजपा आणि कॉंग्रेसमधून आलेल्या सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी आपचे नेते आधीपासून तयारी करीत आहेत. या जागांवर आपच्या नेत्यांकडून बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. (Delhi Assembly Election)
दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपत आहे. 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत आपने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळविला होता. भाजपाचे आठ आमदार निवडून आले होते. मात्र, कॉंग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. दिल्लीत आप आणि भाजपामध्ये मुख्य लढत होणे आहे. आप पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची तयारी करीत आहे. तर जवळपास तीन दशकांचा वनवास संपविण्यासाठी भाजपा मैदानात उतरणार आहे. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community