दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशाविरोधातील याचिका Mumbai High Court कडून निकाली

149
उबाठा पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद कदम (Sadananda Kadam) यांच्या मालकीच्या दापोलीतील (Dapoli) बहुचर्चित ‘साई रिसॉर्ट’ (Sai Resort Case) पाडण्याच्या आदेशाविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) निकाली काढली आहे. हे वादग्रस्त आणि बेकायदेशीर रिसॉर्ट राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते अनिल परब यांच्या मालकीचं असल्याचा आरोप भाजपा नेते आणि मूळ तक्रारदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केला आहे.
भारत सरकारच्या CRZ नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिसॉर्ट पाडण्याचे निर्देश दिले होते. त्या विरोधात सदानंद कदम, अनिल परब यांनी याचिका दाखल केली होती. तसेच न्यायालयाने त्यांना २५ लाख रुपये दंड भरल्यानंतर NGT मध्ये याचिका दाखल करण्यासाठी ४ आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.
(हेही वाचा – सत्ता स्थापनेसाठी अपक्ष उमेदवारांची गरज लागेल का? Devendra Fadnavis म्हणाले…)
रिसॉर्टवर कारवाईचे आदेश काय?
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान विभागानं (एमओइएफसीसी) दापोलीतील ‘साई रिसॉर्ट्स एनएक्स’च्या मालकांना कारणे दाखवा नोटीसी बजावली आहे. ज्यात या रिसॉर्टवर कारवाई का करू नये? अशी विचारणाही केली आहे. इतकचं नव्हे तर पर्यावरणाचं नुकसान केल्याबद्दल 25 लाखांचा दंडही आकरण्यात आलाय. त्याच नोटीसीविरोधात या रिसॉर्टचे मालक सदानंद गंगाराम कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.