Gautam Adani : गौतम अदानींनी समुहावर अमेरिकेत झालेले लाचखोरीचे आरोप फेटाळले

Gautam Adani : अदानी समुहाने अधिकृत पत्रक काढून आपली बाजू मांडली आहे.

73
Gautam Adani : गौतम अदानींनी समुहावर अमेरिकेत झालेले लाचखोरीचे आरोप फेटाळले
  • ऋजुता लुकतुके

भारतातील एक मोठा औद्योगिक समुह असलेल्या अदानी एंटरप्रायजेसने अमेरिकेत झालेले लाचखोरीचे आरोप फेटाळून लावले आहेत. गुरुवारी एक अधिकृत पत्रक काढून समुहाने मीडियामध्ये आपली बाजू मांडली आहे. अमेरिकन न्याय विभाग आणि प्रतिभूती विभागाने अलीकडेच अदानी समुहावर अधिकाऱ्यांना लाच देऊ केल्याचा ठपका ठेवला होता. (Gautam Adani)

अदानी समुहाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, ‘अमेरिकन न्याय विभाग आणि प्रतीभूती विभाग यांनी अदानी ग्रीनच्या ७ संचालकांवर केलेला आरोप हा निराधार आणि बिनबुडाचा आहे. या पत्रकाद्वारे आम्ही या आरोपांचं खंडन करत आहोत. आणि न्याय विभागानेच म्हटल्याप्रमाणे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती किंवा संस्था निर्दोष असते. त्यामुळे आम्ही दोषी नाही.’ (Gautam Adani)

(हेही वाचा – Ind vs Pak Cricket : चॅम्पियन्स करंडकावर चर्चा सुरू असताना भारताचा पाकिस्तानला एक धक्का, ‘या’ स्पर्धेतून घेतली माघार)

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीकडून केंद्र सरकारने सौर ऊर्जा विकत घ्यावी आणि त्यासाठीचा दर बाजारभावापेक्षा थोडा चढाच असावा यासाठी अदानी ग्रीन कंपनीकडून भारत सरकारला २५० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी लाच दिल्याचा आरोप अमेरिकन न्याय विभाग आणि प्रतिभूती विभागाकडून गुरुवारी करण्यात आला आहे. अदानी ग्रीन एनर्जी तसंत एझ्युर पॉवर ग्लोबल लिमिटेड या दोन कंपन्यांचा या घोटाळ्यात सहभाग असून अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानींसह एकूण सात संचालकांवर त्यासाठी ठपका ठेवण्यात आला आहे. (Gautam Adani)

अझ्युर पॉवर कंपनीचा शेअर हा अमेरिकेत न्यूयॉर्क शेअर बाजारात नोंदणीकृत आहे. आणि अदानी ग्रीन एनर्जीने गुंतवणूकदारांकडून ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर गोळा केले. तर एझ्युर कंपनीने अमेरिकन गुंतवणूकदारांकडून १५० दशलक्ष अमेरिकन डॉलर गोळा केल्याचा ठपका अमेरिकेत ठेवण्यात आला आहे. या पैशातूनच अदानी समुहाने सरकारबरोबरचा करार पूर्ण केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने अमेरिकेतील बाँड बाजारातून रोखे विकून पैसे उभे केले आहेत. त्यामुळे तिथल्या कायद्यांनाही कंपनी बांधील आहे. सध्या अदानी समुहाने त्यांच्यावरील लाचखोरीचे सर्व आरोप फेटाळले आहे आणि आरोपांविरुद्ध कायदेशीर मार्ग तपासून पाहणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. (Gautam Adani)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.