PM Narendra Modi यांनी रचला मोठा इतिहास; नेहरू अन् इंदिरा गांधींनाही मागे टाकले, हे आहे कारण

135

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी गयाना दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते गयानाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करतील. पंतप्रधान मोदी १४व्यांदा दुसऱ्या देशाच्या संसदेला संबोधित करणार आहेत. कोणत्याही भारतीय पंतप्रधानांसाठी हा विक्रम ठरला आहे. (PM Narendra Modi)

भारत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मोदींपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Ex PM Narendra Modi) यांनी दुसऱ्या देशाच्या संसदेला सात वेळा संबोधित केले होते. इंदिरा गांधींनी दुसऱ्या देशाच्या संसदेला चार वेळा संबोधित केले, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तीन वेळा, अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी दोनदा आणि राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनीही दुसऱ्या देशाच्या संसदेला दोनदा संबोधित केले. पीव्ही नरसिंह राव आणि मोरारजी देसाई यांनी प्रत्येकी एकदा दुसऱ्या देशाच्या संसदेला संबोधित केले आहे.

दरम्यान, २०१४ मध्ये भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंत अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलियासह आशियातील विविध देशांच्या संसदांना संबोधित केले आहे. मोदींनी आतापर्यंत दोनदा अमेरिकन संसद आणि काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले आहे. पहिल्यांदा २०१६ मध्ये आणि दुसऱ्यांदा २०२३ मध्ये. तसेच २०१४ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि फिजीच्या संसदेला संबोधित केले. २०१५ मध्ये त्यांनी ब्रिटीश संसदेला संबोधित केले, २०१५ मध्ये त्यांनी मॉरिशसच्या संसदेला संबोधित केले आणि २०१८ मध्ये त्यांनी युगांडाच्या संसदेला संबोधित केले. याशिवाय पीएम मोदींनी नेपाळ, भूतान, मंगोलिया, श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तानच्या खासदारांना एकत्र संबोधित केले आहे.

(हेही वाचा – काँग्रेसच्या आरोपांना BJP चे सडेतोड उत्तर)

गयानाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित

पंतप्रधान मोदी एक दिवस आधीच गयानाला (PM Modi Visits Guyana) पोहोचले होते. येथे त्यांनी गयानाचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली (President of Guyana Dr.Mohammed Irfan Ali) यांची भेट घेतली. मोदींची अलीसोबतची भेट अद्भूत असल्याचे सांगण्यात आले. गयानाचे अध्यक्ष डॉ. इरफान अली यांनी पंतप्रधान मोदींना गयानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ (Order of Excellence) देऊन सन्मानित केले. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला गयानाचा सर्वोच्च सन्मान दिल्याबद्दल मी माझा मित्र इरफान अली याचे आभार मानतो. हा सन्मान फक्त माझा नसून १४० कोटी भारतीयांचा आहे, असे ते म्हणाले.

हेही  वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.