Rafael Nadal : राफेल नदालचे व्यावसायिक कमाईचे विक्रम; ‘ही’ आहे बक्षिसांची आयुष्यभराची कमाई

Rafael Nadal : व्यावसायिक टेनिसपटूसाठी बक्षिसाठी कमाई हा एक यशाचा निकष मानला जातो.

48
Rafael Nadal : राफेल नदालचे व्यावसायिक कमाईचे विक्रम; 'ही' आहे बक्षिसांची आयुष्यभराची कमाई
  • ऋजुता लुकतुके

गुरुवारी दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त झाला तेव्हा त्याच्या खात्यात ३८ व्या वर्षी २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदं होती. व्यावसायिक टेनिसपटू म्हणून १४ व्या वर्षी त्याने टेनिस कोर्टवर पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. आणि त्यानंतर २३ वर्षांत त्याने १४ वेळा फ्रेंच ओपन विजेतेपद आणि इतर ८ ग्रँडस्लॅम चषक जिंकले. फ्रेंच ओपन स्पर्धेत त्याची विजयाची टक्केवारी ११२ विजय विरुद्ध ४ पराभव अशी घसघशीत आहे. आणि त्यावरूनच लाल मातीचा बादशाह असं बिरूद त्याला मिळालं.

फ्रेंच पाठोपाठ त्याने ४ युएस ओपन आणि प्रत्येकी २ ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन विजेतेपदं पटकावली आहेत. चार ग्रँडस्लॅम स्पर्धा एकाच वर्षी जिंकण्याची कामगिरी त्याने २४ व्या वर्षीच केली होती. त्यामुळे वयाने सर्वात लहान वयात करिअर स्लॅम पूर्ण करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. ग्रँडस्लॅम खेरिज एकूण ९२ एटीपी विजेतेपदं त्याने पटकावली. आणि २०९ आठवडे तो एटीपी क्रमवारीत अव्वल राहिला. (Rafael Nadal)

(हेही वाचा – CBSE Board Exam 2025 : सीबीएसई दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला होणार परीक्षा)

या सगळ्या कामगिरीमुळेच एटीपी विजेतेपदांमधून नदालने तब्बल १३४ दशलक्ष अमेरिकन डॉलरची कमाई केली आहे. हा एक विक्रमच आहे. आणि ही त्याची कमाई नोवाक जोकोविचच्या खालोखालची आहे. त्याशिवाय विविध जाहिरातींमधूनही नदालची कमाई झाली आहे. नाईकी, टेलिफोनिका अशा जाहिरातींमधून नदालने ४१५ दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या वर कमाई केली आहे. फोर्ब्सच्या यादीतील तो अव्वल दहा कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.

१९ नोव्हेंबरला नदाल आपला शेवटचा व्यावयासिक सामना डेव्हिस चषकात खेळला. स्पेन विरुद्ध नेदरलँड्स लढतीत एकेरी सामन्यात तो बोटिक व्हॅन दीकडून पराभूत झाला. (Rafael Nadal)

(हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पांड्या खेळणार सय्यद अली टी-२० स्पर्धा)

जगातील अव्वल १० एटीपी विजेतेपदांतून कमाई करणारे टेनिसपटू पाहूया,

नोवाक जोकोविच (१८४ दशलक्ष अमेरिकन डॉलर)

राफेल नदाल (१३४ दशलक्ष अमेरिकन डॉलर)

रॉजर फेडरर (१३० दशलक्ष अमेरिकन डॉलर)

अँडी मरे (६४८ लाख अमेरिकन डॉलर)

अलेक्झांडर झ्वेरेव (७७५ लाख अमेरिकन डॉलर)

डॅनिएल मेदवेदेव (४३७ लाख अमेरिकन डॉलर)

पीट स्रँपरस (४३२ लाख अमेरिकन डॉलर)

स्टॅन वॉवरिंका (३७२ लाख अमेरिकन डॉलर)

कार्लोस अल्कराझ (३६८ लाख अमेरिकन डॉलर)

यानिक सिनर (३३९ लाख अमेरिकन डॉलर)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.