Maharashtra Assembly Election Result : सत्ता आली तर Devendra Fadnavis पुन्हा येणार; नाहीतर दिल्लीला जाणार!

महायुतीला बहुमत मिळाले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता आहे. महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला तर मात्र फडणवीस यांना दिल्लीच्या राजकारणात सक्रिय करण्याचा विचार पक्षाकडून होऊ शकतो.

117
  • सुजित महामुलकर

राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांपैकी महायुतीत सर्वाधिक म्हणजेच १४८ जागा भाजपा लढत आहे, तर शिवसेना (शिंदे) ८५ आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी ५५. परिणामी, महायुतीची सत्ता आल्यास त्यात मोठा वाटा हा भाजपाचा असण्याची शक्यता अधिक आहे. तसे झाल्यास देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी बसलेले दिसले तर आश्चर्य वाटू नये. तसे संकेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. गेल्या आठवड्यात धुळ्यातील तसेच पुढील काही सभांमध्ये मोदी यांनी महायुती सरकार येणार असा विश्वास व्यक्त करत फडणवीस यांच्या वाढवण बंदराजवळ विमानतळ आणि धुळ्याचा विकास अशा काही मागण्यांचा विचार केला जाईल, असे स्पष्टच सांगितले. त्यामुळे राज्यात भाजपाचा प्रमुख चेहरा हा दुसरा-तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आहेत, यावर मोदी यांनी शिक्कामोर्तब केले.

शह-काटशहाचे राजकारण

गेल्या काही वर्षात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात शह-काटशहाचे राजकारण सुरू असल्याचे अनेकदा निदर्शनास आले. मग ते राज्यसभा निवडणूक असो की विधान परिषद किंवा नेत्यांना आपल्या गोटात खेचून घेणे असो. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते हुकवत नाहीत. आता या दोन नेत्यांची तुलना करण्याचे कारण असे की, राज्यातील निवडणूक या दोन नेत्यांभोवती फिरत आहे. (Maharashtra Assembly Election Result)

(हेही वाचा Maharashtra Election Exit Poll पहा एका क्लिकवर; महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार?)

लंबी रेस का घोडा

देवेंद्र वयाने तरुण राजकारणी असले तरी त्यांनी गेल्या दशकभरात आपले वेगळे स्थान राज्याच्या राजकारणात निर्माण केले आहे आणि वय कमी (तुलेनेने) असल्याने राजकारणातला ‘लंबी रेस का घोडा’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Result) सर्वाधिक चर्चा होते ती फडणवीस (Devendra Fadnavis) यांची. विरोधी महाविकास आघाडीचे प्रमुख ‘टार्गेट’ आहेत फडणवीस, मग ते उद्धव ठाकरे असो, शरद पवार, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे किंवा ‘एमआयएम’चे असदुद्दीन ओवैसी असो. यावारूनच फडणवीस यांचे राजकीय महत्व अधोरेखित होते.

WhatsApp Image 2024 11 21 at 6.48.16 PM

पक्षादेश, पक्षशिस्त, नैतिकता

पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून उत्तम कामगिरी पार पाडल्यानंतर २०१९ मध्ये भाजपा-शिवसेना युती म्हणून निवडणुकीला (Maharashtra Assembly Election Result) सामोरे गेले आणि स्पष्ट बहुमत मिळाले. भापजाला १०५ जागा मिळाल्या त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, यात शंका नाही. मुख्यमंत्री पद हातातोंडाशी आले असताना उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी वेगळी भूमिका घेतली आणि फडणवीस यांचा भ्रमनिरास झाला. हा धक्का पचवणे कोणत्याही नेत्याला कठीणच होते. मात्र त्यातूनही ते सावरले आणि विरोधी पक्षनेता म्हणून पुन्हा जोमाने कामाला लागले. त्यानंतर अडीच वर्षांनी त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात, पक्षादेश पाळत, उपमुख्यमंत्री म्हणून काम करणे त्यांनी स्वीकारले. यातूनही त्यांची पक्षशिस्त आणि स्वच्छ नीती दिसून येते. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यानंतर फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत सत्तेतील पद सोडून पक्षकार्याची इच्छा व्यक्त केली होती, यातून त्यांची नैतिकता आणि पक्षनिष्ठा या किती तीव्र आहेत हे लक्षात येते. (Maharashtra Assembly Election Result)

(हेही वाचा Assembly Election 2024 : सत्ता कुणाचीही असो, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला रिपीट होणार)

सहकाऱ्यांची मदत

आता विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Result) फडणवीस पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले असून पूर्ण ताकदीने आणि आपल्या जवळच्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतःला निवडणुकीत झोकून दिले आहे. त्यांच्या पडत्या काळात त्यांचे जवळचे राजकीय मित्र आणि हितचिंतक विशेष उल्लेख करण्याजोगे गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना साथ दिली. महाजन यांना तर फडणवीस यांचे ‘संकटमोचक’ असेही संबोधले जाते.

.. तर राष्ट्रीय अध्यक्ष

आठवडाभरात विधानसभा निवडणूक निकाल लागेल. निकाल काय लागेल हे कोणताही सर्व्हे अचूक सांगू शकत नाही. पण महायुतीला बहुमत मिळाले तर फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता आहे. महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला तर मात्र फडणवीस यांना दिल्लीच्या राजकारणात सक्रिय करण्याचा विचार पक्षाकडून होऊ शकतो. फडणवीस यांचे संघटन कौशल्य आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीत त्यांचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास फडणवीस मुख्यमंत्री पदासाठी अन्य नेत्याचा विचार करून त्याप्रमाणे सूत्रे हलविण्यात फडणवीस महत्वाची भूमिका बजावू शकतात. (Maharashtra Assembly Election Result)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.