Maharashtra Assembly Election Result : उद्धव ठाकरे यांचे भवितव्य ठरणार!

उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत किती जागा मिळतात हा‌ महत्त्वाचा मुद्दा आहे. निवडून येणाऱ्या आमदारांची संख्या ही जितकी सत्तेतल्या वाट्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे, तितकीच लोकांच्या मनातली खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

114
  • सुनील पाटोळे

ही विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election Result) उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ही दुसरी संधी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सर्वाधिक २१ जागा लढविल्या आणि ९ जागा जिंकल्या. हा स्ट्राइक रेट या निवडणुकीत वाढवण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आघाडीतील उबाठाचे स्थान पाहता उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला या निवडणुकीत तशा अपेक्षेपेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत. ९२ जागांवर शिवसेना उबाठाचे उमेदवार आहेत. त्यामुळे प्राथमिक पातळीवर तरी उद्धव ठाकरे यांनी आपले राजकीय स्थान बळकट करण्यासाठीचा प्रयत्न जिवंत ठेवलेला आहे.

WhatsApp Image 2024 11 21 at 6.34.36 PM

तिन्ही पक्षांना समान संधी

‘मविआ’चे जागा वाटप पाहता बहुमत मिळाल्यास सध्या तरी तिघांनाही मुख्यमंत्रीपदासाठी समान संधी असल्याचे दिसते आहे. जागा मिळाल्या असल्या, तरी उमेदवार निवडून आणण्याचे खडतर आव्हान शरद पवार आणि काँग्रेसपेक्षा उद्धव ठाकरेंसमोर (Uddhav Thackeray) जास्त आहे. पक्षफुटीनंतर संघटना दुभंगली गेली आहे. पक्ष संघटनेतील ताकदवान नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे नेते आणि कार्यकर्ते या दोन्हीचा अभाव आहे. पण ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशा अवस्थेत असलेला कुंपणावरचा शिवसैनिक कोणाच्या झोळीत मताचे दान टाकतो, त्यावरही काही समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आणखी एक फॅक्टर म्हणजे १३४ जागा लढवणारा दुसरा पक्ष मनसे कोणाची गणिते बिघडवणार यावरही थोडे अवलंबून आहे. मनसे कोणाच्या मतांचे विभाजन करते, यावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे यश अवलंबून असेल. (Maharashtra Assembly Election Result)

(हेही वाचा Maharashtra Election Exit Poll पहा एका क्लिकवर; महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार?)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रचारसभांमधली भाषणांची पातळी पाहता त्यात राजकीय परिपक्वतेचा अभाव जाणवतो. शाब्दिक कोट्या आणि मर्दाच्या औलादीची भाषा ही फक्त त्या वेळेला टाळ्या आणि शिट्ट्या मिळवून देते, त्यामुळे सभेची गर्दी विचारांच्याबाबतीत रिकाम्या हातीच घरी जाते, मग अशा सभांचा उपयोग काय? ही गर्दी मतांमध्ये कशी परिवर्तित होणार? उद्धव ठाकरेंना अद्याप हे उमजू नये, हे दुर्दैव. भाषणांमधील विषयांची हाताळणी या पातळीवर उद्धव ठाकरे संभ्रमित झालेले दिसत आहेत. अर्थात सोबत असलेल्या काँग्रेस आणि शरद पवारांमुळे उद्धव ठाकरेंवर भूमिका घेण्याबाबत काही मर्यादा आलेल्या असू शकतात; म्हणूनच हिंदुत्वासारख्या विषयापासून ते दूर जात आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा हा मुलगा राजकीय अपरिहार्यतेमुळे अशी वैचारिक तडजोडीची भूमिका घेतो, याकडे महाराष्ट्राची जनता कशी पाहते, यावर उद्धव ठाकरेंचे भविष्य अवलंबून आहे. काँग्रेस आणि पवारांच्या वोट बँकेच्या कुबड्या उद्धव ठाकरेंना फार काळ तारू शकणाऱ्या नाहीत. (Maharashtra Assembly Election Result)

दुसरे म्हणजे पाच वर्षांपूर्वी भाजपाला पर्याय देण्यासाठी निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचा शिवसेना हा घटक पक्ष बनला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सत्तापदे न घेण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कुटुंबासाठी घालून दिलेला पायंडा मोडत ‘महाराष्ट्राची, मराठी माणसांची गरज’ असे लेबल लावून सत्तेच्या राजकारणात उद्धव अडकत गेले, यातून त्यांच्याबाबतीत नकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे, याचा फटका त्यांना बसू शकतो.

(हेही वाचा Maharashtra Assembly Election : सट्टा बाजारचा कौल कोणाला? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार?)

लढाई सोपी नाही

वस्तुस्थिती काहीही असली, तरी एकनाथ शिंदे यांनी पक्ष पळवला, त्यानंतरच्या कायदेशीर लढाईतही पक्षपातीपणा झाला, हा संदेश लोकांमध्ये पसरवण्यात उद्धव ठाकरे काही प्रमाणात यशस्वी झालेले आहेत. याचा फायदा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Result) कसा होतो, यावर उद्धव ठाकरे यांचे यश अवलंबून आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटाची वोट बँक वेगळ्या विचारांची होती, तरीही त्यांनी लोकसभेला उद्धवना साथ दिली. विधानसभा निवड‌णुकीत असेच चित्र राहिले, तर त्याचा फायदा उद्धव (Uddhav Thackeray) यांना होऊ शकतो. तरी लढाई सोपी नसेल, कोणत्या एका फॅक्टरवर उद्धव यांच्या शिवसेनेला बाजी मारणे शक्य नाही. त्यांच्या दृष्टीने सकारात्मक असलेल्या वरील तीन – चार गोष्टी एकाचवेळी जुळून आल्या, तर एका चमत्कारिक यशाचा आशावाद उद्धव ठाकरे बाळगू शकतात.

उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत आणखी एक घटक महत्त्वाचा राहील, तो म्हणजे त्यांना एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत किती जागा मिळतात हा‌. निवडून येणाऱ्या आमदारांची संख्या ही जितकी सत्तेतल्या वाट्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे, तितकीच लोकांच्या मनातली खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. लोकसभेतल्या निकालातून असा कोणता स्पष्ट निष्कर्ष काढता आला नाही; कारण संमिश्र स्थिती होती; म्हणूनच ही निवडणूक ठाकरेंसाठी विशेष आहे. यातील यश-अपयशावरच त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. अर्थात एका निवडणुकीत कोणी संपत नाही किंवा सत्तेचा कायमस्वरूपी मुकूटही घेऊन येत नाही. हे खरे असले, तरी त्यातून काही संकेत नक्की मिळतात. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) बाबतीत तेच संकेत या निवडणूक निकालातून मिळणार आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.