Maharashtra Assembly Election 2024: स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर ! मतमोजणी केंद्रावर सुरक्षा यंत्रणेचा फौजफाटा तैनात

69
Maharashtra Assembly Election 2024: स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर ! मतमोजणी केंद्रावर सुरक्षा यंत्रणेचा फौजफाटा तैनात
Maharashtra Assembly Election 2024: स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर ! मतमोजणी केंद्रावर सुरक्षा यंत्रणेचा फौजफाटा तैनात

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून, सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील 61.1% वरुन यावेळी अंदाजे 66% पर्यंत मतदानाचे प्रमाण पोहोचले आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. निरीक्षक व उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समोर सीलबंद स्ट्राँग रूम्स (Strong room) उघडण्यात येतील व ईव्हीएम (EVM) मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Vidhansabha Result : २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी, काय आहे निवडणूक आयोगाची व्यवस्था)

मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सी.सी. टीव्हीद्वारे चित्रित केली जाईल. तीन- स्तरीय सुरक्षा व्यवस्था निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात आली आहे. चांदिवली विधानसभेचे मतमोजणी केंद्र विद्याविहार पश्चिमेकडील आयटीआय येथे असून, या केंद्रावर बुधवारपासूनच पोलिस आणि दंगल नियंत्रण पथक दाखल झाले होते. केंद्राच्या गेटवर दंगल नियंत्रण पथकाचे जवान तैनात करण्यात आले होते. एकूण ३६ स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), (CRPF) केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) (CAPF) यांच्यासह राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) तसेच पोलिस तैनात आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

ठाण्यात ८७५५ ईव्हीएमची सुरक्षा

ठाणे जिल्ह्यातील ६,९५५ मतदान केंद्रांमधील ८,७५५ मतदान यंत्रांसह कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटची सुरक्षाव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलासह स्थानिक पोलिसांवर आहे. मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि सुरक्षा जवानांचा कडक बंदोबस्त ठेवला आहे. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष मतमोजणी होणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result : सत्ता आली तर Devendra Fadnavis पुन्हा येणार; नाहीतर दिल्लीला जाणार!)

नवी मुंबईत ऐरोलीतील ईव्हीएम तेथील सरस्वती विद्यालयात तर बेलापूरच्या मशिन्स नेरूळच्या आगरी कोळी भवनमध्ये ठेवल्या आहेत. दोन्ही ठिकाणी ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय बंदोबस्त लावण्याला असून प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्हींची देखील नजर ठेवली आहे. मशिन्स ठेवलेल्या ठिकाणी सीआरपीएफ, गुजरात एसआरपी व नवी मुंबई पोलिस यांच्या तुकड्यांचा समावेश आहे. तर केंद्राच्या बाहेरदेखील कोणतीही गैर हालचाल घडू नये यासाठी दहा अधिकारी व ३० कर्मचाऱ्यांचा दिवस-रात्र बंदोबस्त ठेवला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result : दुकान बंद करण्याची वेळ Raj Thackeray यांच्यावर येणार नाही!)

पालघर जिल्ह्यात सहा ठिकाणी स्ट्रॉग रूम असून मतदान यंत्रे कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघातील मतदान यंत्रे तेथील स्ट्रॉग रूममध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. पनवेलमधील मतमोजणी केंद्रावर ६८९ कर्मचारी कार्यरत राहतील. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.