वाढीव मतदानाचा लाभ Ajit Pawar यांना Baramati मध्ये होणार का?

65
वाढीव मतदानाचा लाभ Ajit Pawar यांना Baramati मध्ये होणार का?
वाढीव मतदानाचा लाभ Ajit Pawar यांना Baramati मध्ये होणार का?

राज्यातील काही लक्षवेधी लढतीपैकी एक म्हणजे शरद पवार यांचा बालेकिल्ला समजाला जाणारा बारामती विधानसभा मतदार संघ. लोकसभेला शरद पवार यांनी अजित पवार यांना शह दिला. शरद पवार यांच्या पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. मात्र विधानसभेसाठी अजित पवार स्वतः निवडणूक रिंगणात असून त्यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरले आहेत. (Baramati)

(हेही वाचा- महायुतीला १७८-२०० जागा मिळणार; एक्सिस माय इंडियाचा Exit Poll काय सांगतो?)

अजित पूर्ण ताकदीने उतरले

उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवत मतदार संघावर एकहाती वर्चस्व मिळवले होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीला पहिल्यांदाच अजित पवार यांना त्यांच्याच बारामतीत धक्का बसला. मात्र, कदाचित, रणांगणातून पळ काढल्याचा ठपका बसू नये, यासाठी आपला पुतण्या युगेंद्र याच्यासमोर लढण्याची तयारी अजितदादांनी केली आणि पूर्ण ताकदीने उतरले. (Baramati)

१.६५ लाख मताधिक्य

२०१९ मध्ये बारामती विधानसभा मतदार संघात ५०.३७ टक्के मतदान झाले होते आणि त्यातील अजित पवार यांना १.९५ लाख मतदान झाले होते तर त्यांचा जवळचा प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर ३०,००० वरच अडकले. तब्बल १.६५ लाख मतांच्या फरकाने अजित पवार यांनी निवडणूक जिंकली. (Baramati)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election Result : यश मिळो अथवा अपयश, Eknath Shinde यांचा कसोटीचाच काळ!)

पक्ष चार, तरी मताधिक्य ९०,०००

२०१४ मध्ये चारही पक्ष विधानसभा निवडणूक वेगळे लढले तेव्हा ७३.४० टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजपाचे प्रभाकर गावडे यांना ६०,७९७ मतदान झाले तर कॉँग्रेसचे आकाश मोरे आणि शिवसेनेचे राजेंद्र काळे हे दोघे ४,१०० चा आकडा गाठू शकले नाही आणि अजित पवार यांना १,५०,५८८ इतके मतदान झाले. जवळपास ९० हजाराच्या फरकाने ही निवडणूक अजित पवार यांनी जिंकली. (Baramati)

२१ टक्के मतदान वाढले

२०२४ ची निवडणूक अजित पवार यांना तितकी सोपी नसावी. कारण अजित पवार यांच्या समोर त्यांचे काका शरद पवार उभे ठाकले आहेत. शरद पवार यांनी अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास यांचे पूत्र युगेंद्र यांना तिकीट देऊन अजित पवारांना आव्हान दिले. बुधवारी २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी मतदान झाले. एकूण ७१.०३ मतदारांनी मतदानात भाग घेतला. २०१९ च्या तुलनेत २१ टक्के मतदान वाढले आहे. त्याचा फायदा युगेंद्र यांना होणार की अजित पवार यांना? याबाबत जनतेत कमालीचे औत्सुक्य आहे. (Baramati)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election Result : सत्ता आली तर Devendra Fadnavis पुन्हा येणार; नाहीतर दिल्लीला जाणार!)

जनतेची पसंती अजित पवार

मतदानानंतर ८-९ एक्जिट पोल प्रसिद्ध झाले. त्यातील ६-७ पोलमध्ये महायुतीचे सरकार येणार असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे वाढीव मतदानाचा लाभ महायुतीला होईल असे म्हटले जाते. अजित पवार यांच्या बारामती मतदार संघातही युगेंद्र यांच्या उमेदवारीमुळे अजित पवार चिंतेत असले तरी युगेंद्र यांच्यापेक्षा जनता अजित पवार यांना पसंती देईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Baramati)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.