राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले आहे. विविध एक्झिट पोल्सद्वारे मतदारांचा कलही (Maharashtra Exit Polls 2024) समोर आला आहे. राज्यात नक्की कोणाची सत्ता येणार, याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. 23 तारखेला निकाल लागले की, सगळे चित्र स्पष्ट होईल; तोपर्यंत सर्वच पक्ष आपापली यंत्रणा वापरून जनतेचा कौल काय आहे, त्याचा अंदाज घेत आहेत. (Maharashtra Election Exit Poll 2024)
(हेही वाचा – Maharashtra Vidhansabha Result : २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी, काय आहे निवडणूक आयोगाची व्यवस्था)
बुधवारी मतदान संपल्यानंतर भाजपने (BJP) बुथ लेव्हलवरुन माहिती गोळा केली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला 164 जागा, तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) अवघ्या 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. अपक्ष आणि इतर उमेदवारांना 24 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भाजपच्या या बुथ लेव्हल एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महायुतीमध्ये भाजपला 100, शिंदे गटाला 42 आणि अजित पवार गटाला 22 जागांवर विजय मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला 40, शरद पवार गटाला 35 आणि उद्धव ठाकरे गटाला 25 जागा मिळण्याची शक्यता आहे.
मतदानाचा टक्का जेव्हा वाढतो तेव्हा त्याचा अर्थ प्रस्थापित सरकारविरोधातील वातावरण आहे, असा घेतला जातो. मात्र, यंदा महिला मतदारांची टक्केवारी वाढल्याने लाडक्या बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) महायुतीला फायदा होईल का, वाढलेले मतदान प्रस्थापितविरोधी लाट आहे का, याचा अंदाज घेतला जात आहे. (Maharashtra Election Exit Poll 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community