झाशीच्या राणीसाठी प्राण पणाला लावणाऱ्या सरसेनापती Jhalkaribai यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

78
झाशीच्या राणीसाठी प्राण पणाला लावणाऱ्या सरसेनापती Jhalkaribai यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?
झाशीच्या राणीसाठी प्राण पणाला लावणाऱ्या सरसेनापती Jhalkaribai यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

झलकारी बाई ही झाशीच्या राणीच्या महिला सैन्याची सरसेनापती होती. १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ती झाशीच्या राणीच्या प्रमुख सल्लागाराच्या पदावरही पोहोचली होती. झाशीच्या किल्ल्यावर ज्या वेळी वेढा घातला गेला, त्या वेळी तिने राणी लक्ष्मीबाई यांचा वेश धारण केला आणि इंग्रज सैन्याच्या विरोधात आघाडीवर लढू लागली. त्यामुळेच राणीला किल्ल्यातून सुरक्षितपणे बाहेर पडता आलं. (Jhalkaribai)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election Result : जुळवून घेणार की Sharad Pawar फोडाफोडी करणार?)

झलकारी बाईचा जन्म २२ नोव्हेंबर १८३० साली झाशी जवळ असलेल्या भोजला नावाच्या एका गावात झाला. तिच्या वडिलांचं नाव सदोवा सिंह असं होतं. ते शेतकरी होते. तिच्या आईचं नाव जमुना देवी असं होतं. (Jhalkaribai)

तिने एकदा जंगलात गुरं पाळण्यासाठी वापरलेल्या काठीने बिबट्याला मारलं होतं. झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि झलकारी बाई यांच्यामध्ये खूप साम्य होतं. त्यामुळेच तिला झाशीच्या सैन्यात महिला शाखेमध्ये सामील करण्यात आलं होतं. झाशीच्या राणीच्या सैन्यात सामील झाल्यानंतर तिला तिच्या युद्ध कौशल्यामुळे आणि चातुर्यामुळे लगेचच बढती मिळाली होती. (Jhalkaribai)

(हेही वाचा- Maharashtra Election Exit Poll 2024 : भाजपच्या सर्वेनुसार महायुतीला मिळणार ‘इतक्या’ जागा)

१८५७ च्या स्वातंत्र्य समरामध्ये इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्यावर वेढा घातला होता. त्या वेळी झलकारी बाईने रणनीती वापरून राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखीच वेशभूषा केली आणि इंग्रजांच्या हातावर तुरी देत राहिली. ती इंग्रज सैन्याविरुद्ध झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून लढत होती. (Jhalkaribai)

झाशीच्या महिला सैनिकांबरोबर झलकारी बाईंनी इंग्रजांच्या १४,००० सैनिकांच्या विरुद्ध लढा दिला. त्यामुळे झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंना आपल्या दत्तक मुलांसोबत भंडारी दरवाज्याने किल्ल्याबाहेर निघून जाता आलं. इंग्रजांच्या विरुद्धच्या या लढाईतच झलकारी बाईला वीरगती प्राप्त झाली. (Jhalkaribai)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election Result : उद्धव ठाकरे यांचे भवितव्य ठरणार!)

झलकारीबाईची पुण्यतिथी वेगवेगळ्या कोळी संघटनांद्वारे शहीद दिवस म्हणून साजरी केली जाते. भारत सरकारच्या पोस्ट आणि टेलिग्राफ विभागानेही झलकारी बाईचे चित्र असणारं टपाल तिकीट जारी केलं आहे. (Jhalkaribai)

१० नोव्हेंबर २०१७ साली तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भोपाळ इथल्या गुरु तेग बहादूर कॉम्प्लेक्समध्ये उभारलेल्या झलकारी बाईच्या पुतळ्याचं अनावरण केलं. (Jhalkaribai)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.