Bitcoin Scams मधील आवाज एआयचा नाही; रवींद्र पाटील यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

54
Bitcoin Scams मधील आवाज एआयचा नाही; रवींद्र पाटील यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
Bitcoin Scams मधील आवाज एआयचा नाही; रवींद्र पाटील यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) व पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) बिटकॉइन गुन्ह्यातील पैशाचा वापर खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला, असे गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला केले. याबाबत त्यांनी गौरव मेहता यांच्यासोबत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या संभाषणाची क्लिपही त्यांनी ऐकवली होती. (Bitcoin Scams)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक प्रचारातील मुद्द्यांची निवडणूक आयोगाने घेतली दखल)

यानंतर या क्लिपमधील आवाज हा खासदार सुप्रिया सुळेंचा नाही, तर एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्याची टीका सुप्रिया सुळेंचे समर्थक आणि आघाडीमधील काही नेते यांनी केला. यानंतर रवींद्र पाटील यांनी संबंधित ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे यांचाच असून त्याबाबतचे आणखी पुरावे माझ्याकडे आहेत, असे पुन्हा स्पष्ट केले आहे.

सुप्रिया सुळे यांच्या आवाजातील आणखी एक क्लिप पाटील यांनी समोर आणली आहे. या नव्या क्लिपमध्ये सांगण्यात आले की, अमिताभ ही माझी जबाबदारी नाही, कशा प्रकारे हे प्रकरण हाताळायचे. कॅश निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, कोणत्याही परिस्थितीत मला कॅश हवी आहे. तर, दुसऱ्या क्लिपमध्ये अमिताभ गुप्ता सांगतात की, सुप्रिया जर माझ्यासोबत काही चुकीचे झाले, तर मी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सर्वांना उघड करेन, असे या क्लिपमध्ये म्हटले आहे.

अधिक माहिती पुढील काळात समोर येईल – रवींद्र पाटील

रवींद्र पाटील (Ravindra Patil) म्हणाले, शरद पवार मी केलेल्या आरोपासंदर्भात बिटकॉइन प्रकरणात मी एक वर्ष कारागृहात राहून आल्याने लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगतात. मात्र, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेदेखील १४ महिने कारागृहात राहिल्यानंतर ते त्यांना कशा प्रकारे महत्त्व देत आहेत, हे दिसून येत आहे. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या असल्याने त्यांना पाठीशी घालण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. तसेच तपास यंत्रणादेखील दबावाखाली असून सुळे या शरद पवारांची मुलगी असल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करत नाहीत, अन्यथा सामान्य व्यक्ती या प्रकरणात असती तर त्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली असती. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून माझ्या हाती जी माहिती आली आहे त्यानुसार पुरावे पाहून मी बिटकॉइन गैरव्यवहाराची माहिती उघड केली. ईडीने गौरव मेहता याचे मोबाइल जप्त केले असून त्यातून अधिक माहिती पुढील काळात समोर येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

राज्य गुप्तचर यंत्रणेने मागवली कागदपत्रे

निवडणूक आयोगाने पाटील यांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारणा केली की, कोणत्या मतदारसंघात हा प्रकार घडला आहे, कोणते राजकीय पक्ष त्याच्याशी संबंधित आहेत तसेच कोणत्या अन्य व्यक्ती त्यात सहभागी आहेत. तसेच राज्य गुप्तचर यंत्रणेनेदेखील त्यांच्याकडून आरोपाबाबत कागदपत्रे मागितली आहेत. संबंधित माहिती पाटील यांनी निवडणूक आयोगास दिली आहे. (Bitcoin Scams)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.