Maharashtra Assembly Election 2024: विजयी आमदार सांभाळण्याचे मविआसमोर आव्हान !

85
Maharashtra Assembly Election 2024: विजयी आमदार सांभाळण्याचे मविआसमोर आव्हान !
Maharashtra Assembly Election 2024: विजयी आमदार सांभाळण्याचे मविआसमोर आव्हान !

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून, सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील 61.1% वरुन यावेळी अंदाजे 66% पर्यंत मतदानाचे प्रमाण पोहोचले आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. दरम्यान, विजयी आमदार सांभाळण्याचे आव्हान मविआसमोर आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक प्रचारातील मुद्द्यांची निवडणूक आयोगाने घेतली दखल)

विधानसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर राहिल्यास महायुतीने (Mahayuti) छोट्या छोट्या पक्षांची मोट बांधायची रणनीती आखली आहे. जे पक्ष महायुतीत नाहीत, त्यांना संपर्क साधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आम्ही कोणत्याही अपक्षांच्या संपर्कात नसल्याचे गुरुवारी सांगितले होते. मात्र, महायुतीच्या गोटातून अपक्ष आणि बंडखोरांनी संपर्क साधण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर यांच्या अस्तित्वाची लढाई)

गुरुवारी संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांची बैठक झाली. या बैठकीनुसार, आमदारांना काँग्रेस शासित राज्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे. एका माहितीनुसार या आमदारांना कर्नाटक वा तेलंगणा येथे नेण्यात येईल. या आमदारांना शनिवारीच इतर राज्यात पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. म्हणजे विजयाचा गुलाल उधळला की हे आमदार इतर राज्यात रवाना होतील. यामध्ये किती अपक्ष आणि बंडखोर असतील हे निकालानंतरच समोर येईल. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.