- प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मुंबई पोलिसांनी गुरुवारी शहरातील मतमोजणी केंद्रांभोवती निर्बंध जारी केले आहे. प्रतिबंधात्मक आदेशात मुंबई पोलिसांनी सांगितले की, २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या आगामी मतमोजणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी निर्बंध आदेश जारी केले जात आहेत. मुंबई पोलिसांचे पोलिस उपायुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी हा आदेश जारी केला आहे. (Assembly Election Result)
२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अंमलात येणारा हा आदेश, निवडणूक अधिकारी किंवा कर्तव्यावर असलेल्या सार्वजनिक सेवकांव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला संपूर्ण शहरात नियुक्त मतमोजणी केंद्रांच्या ३०० मीटरच्या आत गटाने फिरण्यास किंवा एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून, जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या निर्बंधाचा उद्देश अडथळा, सार्वजनिक गोंधळ टाळण्यासाठी आणि निवडणूक कर्मचारी आणि जनता या दोघांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे, असे आदेशात म्हटले आहे. (Assembly Election Result)
(हेही वाचा – राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातच ठरणार दिल्लीत नाही – Sanjay Raut)
महामार्ग रोड, स्ट्रीट लेन, बाय-लेन किंवा कोणत्याही मतमोजणी केंद्रापासून ३०० मीटर अंतरावरील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीशी संबंधित अधिकारी किंवा मतमोजणी केंद्रांवर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही सार्वजनिक सेवकांव्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती, सभा किंवा गट तयार करू शकत नाही. बोरिवली आणि दहिसर ते अंधेरी, वांद्रे, वरळी आणि कुलाबा या संपूर्ण शहरात पसरलेल्या प्रमुख मतमोजणी केंद्रांचा समावेश आहे. (Assembly Election Result)
ही केंद्रे विविध महापालिका शाळा, कम्युनिटी हॉल आणि इतर सार्वजनिक ठिकाणी पसरलेली आहेत ज्यांचा उपयोग निवडणुकीच्या निकालांची मोजणी करण्यासाठी केला जाईल. या आदेशात पुढे म्हटले आहे की, क्षेत्राच्या शांततेला कोणताही धोका टाळण्याची गरज आहे, ज्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा सुरक्षा धोके निर्माण होऊ शकतात. महाराष्ट्रातील २८८ सदस्यीय विधानसभेसाठी बुधवारी मतदान झाले असून शनिवारी मतमोजणी होणार आहे. मुंबईत ३६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे .२० नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अंदाजे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. (Assembly Election Result)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community