महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून, सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील 61.1% वरुन यावेळी अंदाजे 66% पर्यंत मतदानाचे प्रमाण पोहोचले आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. तरी, बहुतांश एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीची सत्ता येईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) हे निकालानंतर मविआची साथ सोडून महायुतीसोबत हातमिळवणी करु शकतात, असा दावा भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री नाहीत
नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आपला ट्रॅक बदलू शकतात. ते कोणत्याही बाजूला जाऊ शकतात. शरद पवार (Sharad Pawar) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेससोबत राहणार नाहीत. शरद पवार महायुतीसोबत हातमिळवणी करु शकतात. त्यामुळे राज्यात कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार नाही आणि उद्धव ठाकरे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत.”
संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली
“विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना रस्त्याने चालणं कठीण होईल. संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. आता शिवसेनेचं पूर्वीसारखं वर्चस्व राहिलेलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त दोन दिवस मंत्रालयात गेले.” अशी टीका नारायण राणेंनी (Narayan Rane) केली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community