महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून, सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील 61.1% वरुन यावेळी अंदाजे 66% पर्यंत मतदानाचे प्रमाण पोहोचले आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. मात्र, निवडणूक आयोगाने (Election Commission) विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता काळात स्थीर पथक आणि भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर रोकड व मौल्यवान वस्तू जप्त केल्या होत्या. (Maharashtra Assembly Election 2024)
(हेही वाचा-Assembly Election Result 2024 : स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी १० हजार पोलिस तैनात)
मतदान (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) झाल्यानंतर आता अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात एका एस टी (ST Bus) बसच्या सीटखाली प्रवाशाला नोटांचा बंडल आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. 500 रुपयांच्या नोटांचे दोन बंडल सापडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ही घटना असून एसटी आगार व पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या एका युवकाने बसमधील वाहकाकडे नोटांचे हे दोन्ही बंडल सुपूर्द केले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक प्रचारातील मुद्द्यांची निवडणूक आयोगाने घेतली दखल)
ही रक्कम कोणाची आहे ? कोणत्या कामासाठी ही रक्कम बसमधून नेण्यात येत होती, याचा तपास करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी हीच बस स्ट्रॉंग रुमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रावर गेली होती. त्यानंतर काल याच बसने कोपरगाव -वैजापूर-कोपरगाव अशा फेऱ्या केल्या आहेत. काल सायंकाळी कोपरगावहून धामोरीकडे जात असताना बसमधील एका विद्यार्थ्याला शेवटच्या सीटखाली नोटांचे दोन बंडल सापडले आहेत. या दोन्ही बंडलमधील नोटांची बेरीज केली असता तब्बल 86 हजारांची रोख रक्कम सापडल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community